
अंतिम सामन्यात पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला. या विश्वचषकासह अर्जेंटिना संघाने तिसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. तेव्हा या ऐतिहासिक क्षणाची आठवण कायम स्मरणात रहावी म्हणून अर्जेंटिना संघाने 'A piece of history' म्हणून एक गोष्ट सोबत घेतली.
कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा (FIFA World Cup) रविवारी संपन्न झाली. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह अर्जेंटिना संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर फिफा विश्वचषक जिंकण्याचा बहुमान पटकावून एक नवीन इतिहास घडवला. या विजयासह अर्जेंटिना संघाने तिसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. तेव्हा या ऐतिहासिक क्षणाची आठवण कायम स्मरणात रहावी म्हणून अर्जेंटिना संघाने ‘A piece of history’ म्हणून गोल कोस्टची नेट फाडून ती सोबत घेतली.
अंतिम सामन्यात पेनेल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा फरकानं अर्जेंटिनाने फ्रान्सवर विजय मिळवला. त्यात फ्रान्सकडून किलियन एम्बापेनं पहिला गोल केला. फ्रान्सला आघाडीवर नेल. पण त्यानंतर फ्रान्सच्या दोन खेळाडूंना गोल करता आला नाही. दुसरीकडे मेसीसेनेनं सलग तीन गोल केले होते. आणि पेनेल्टी शूटआऊटवर आपला ताबा मिळवला होता.
A piece of history 🥅 ✂️ #FIFAWorldCup #Qatar2022 pic.twitter.com/R0QsY38xGP
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 19, 2022
चौथी किक फ्रान्सच्या रान्डाल कोलो माओनीनं मारली, गोलही केला. या अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या गोन्झालो मॉन्टिएलनं गोल केला आणि अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. तेव्हा विजयानंतर अर्जेंटिना संघाने ‘A piece of history’ म्हणून गोल कोस्टची नेट फाडून ती एक आठवण म्हणून आपल्या सोबत घेऊन गेले. अनेक खेळाडूंनी या गोल कोस्टच्या नेटसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावर टाकले असून त्याला ‘A piece of history’ म्हणून संबोधले आहे.