युझवेंद्र चहलने इतिहास रचल्यावर पत्नीने केला प्रेमाचा वर्षाव

आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा युझवेंद्र चहल हा एकमेव गोलंदाज आहे. चहलने आयपीएलमधील 153 व्या सामन्यात 200 वी विकेट घेतली आहे.

    युझवेंद्र चहल : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या या लीगमध्ये अनेक खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड मोडले. कालच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये झालेल्या महामुकाबल्यात राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीला बाद करून त्याने ही कामगिरी केली आहे. मोहम्मद नबीची विकेट घेत त्याने ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा युझवेंद्र चहल हा एकमेव गोलंदाज आहे. चहलने आयपीएलमधील 153 व्या सामन्यात 200 वी विकेट घेतली आहे.

    धनश्री वर्माची इंस्टाग्राम पोस्ट
    चहलने इंडियन प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचल्यावर त्याचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात आले आहे. याचदरम्यान युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून युजवेंद्रवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. यासोबत धनश्रीने लिहिले – “चांगला पात्र आहे, आयपीएलच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज. अजून खूप काही करायचे बाकी आहे. तो महान आहे. मी आधीच सांगत होते.”

    IPL मध्ये पहिल्या विकेटपासून 200 व्या विकेटपर्यंतचा प्रवास युझवेंद्र चहलने IPL मध्ये तीन फ्रँचायझींसाठी सामने खेळला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स आणि आता राजस्थान रॉयल्सचा समावेश आहे. चहलने 17 एप्रिल 2014 रोजी दिल्लीविरुद्ध पहिली विकेट घेतली. आणि आता मुंबईविरुद्ध 200 वी विकेट घेतली.