radhika and ajinkya rahane

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा वडील बनणार असल्याची माहिती त्याची बायको राधिकाने (Radhika Rahane) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

    भारतीय फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पुन्हा एकदा बाबा होणार आहे. अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा वडील बनणार असल्याची माहिती त्याची बायको राधिकाने (Radhika Rahane) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. अजिंक्य रहाणे वडील बनणार असल्याची माहिती कळताच चाहत्यांनी अजिंक्य आणि राधिकाचं अभिनंदन केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar)

    अजिंक्य रहाणेनं खराब खेळीमुळं भारतीय संघातील आपलं स्थान गमावलं आहे. दरम्यान रहाणेची पत्नी राधिका धोपावकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पती अजिंक्य रहाणे, मुलगी आर्या यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ऑक्टोबर २०२२ मध्ये दुसऱ्या बाळाचं आगमन होणार असल्याचं सांगितलं आहे.

    अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका हे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. त्या दोघांनी २६ सप्टेंबर २०१४ रोजी लग्न केलं होतं. ऑक्टोबर २०१९ मध्ये अजिंक्य आणि राधिकाला पहिली मुलगी झाली. आता तीन वर्षांनी त्यांच्या घरी पुन्हा बाळाचं आगमन होणार आहे.