वेस्ट इंडिजविरुद्ध अजिंक्य रहाणेचा नेहमीच राहिला मोठा रेकॉर्ड; कॅरेबिअनविरुद्ध केल्यात मोठ्या धावा

Ajinkya Rahane Vs WI In Test : बुधवारपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे. या दौऱ्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मागील आयपीएलमध्ये तसेच टेस्टमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  Ajinkya Rahane Vs WI In Test : बुधवारपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरोधात सुरुवातीला दोन कसोटी सामने खेळणार आहे. 12 जुलै रोजी डोमिनिका येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दीड वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे याला भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आलेय. गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य रहाणे दमदार फॉर्मात आहे. देशांतर्गंत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. वेस्ट इंडिजमध्येही अजिंक्य रहाणे दमदार कामगिरी करु शकतो. कारण, वेस्ट इंडिजविरोधात त्याची बॅट नेहमीच तळपते. वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य रहाणे याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत.
  वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य रहाणे याने कसोटीत 102.8 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. अजिंक्य रहाणे याने आठ कसोटी डावात पाच वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य रहाणे याने सहा कसोटी सामन्यात 1091 धावा काढल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 इतकी आहे. सध्या वेस्ट इंडिजमध्ये असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूमध्ये कॅरेबिअनच्या खेळपट्टीवर सर्वाधिक धावा काढण्याचा पराक्रम अजिंक्य रहाणे याच्याच नावावर आहे.
  दीड वर्षानंतर पुनरागमन –
  अजिंक्य रहाणे याने 18 महिन्यानंतर भारतीय संघात पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. देशांतर्गत सामन्यात खोऱ्याने धावा काढल्याच… पण चेन्नईमध्ये खेळताना त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. फॉर्मात परतलेल्या अजिंक्य रहाणे याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणे याने दमदार कामगिरी केली. भारताकडून त्याने सर्वाधिक धावा काढल्या. पण तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. वेस्ट इंडिजविरोधात अजिंक्य रहाणे याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कॅरेबिअन आर्मीविरोधात अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधार असेल.
  वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ –
  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल,ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.