अजित पवार यांना ‘एमओए’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार

भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. याच आधारे अजित पवार यांना एमओएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विदर्भ केसरी खासदार रामदास तडस यांनी कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळेच शरद पवार यांचेही ३२ वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

    मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (Maharashtra Olympic Association) अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) वतीने नियुक्त भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (Indian Olympic Federation) हंगामी अध्यक्ष अनिल खन्ना (Anil Khanna) यांनी ११ जुलै रोजी या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.

    भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला घटनेमध्ये बदल करावा लागणार आहे. याच आधारे अजित पवार यांना एमओएच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. विदर्भ केसरी खासदार रामदास तडस यांनी कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व स्थापित केले आहे. त्यामुळेच शरद पवार यांचेही ३२ वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.

    नवनियुक्त हंगामी प्रशासक अनिल खन्ना यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक महासंघाला संलग्न राष्ट्रीय स्पोर्ट्स फेडरेशन, राज्य ऑलिम्पिक असाोसिएशन, यूटी ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष, सचिव आणि महासचिवांना पत्र पाठवले. यात त्यांनी संबंधित संघटनांच्या घटनेवर आक्षेप घेतला. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. यामुळे होणाऱ्या वादामुळे आता तत्काळ स्पोर्ट्स कोड लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी या कोडमध्ये महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत.