अंबानींच्या Jio ने मागितली फुटबॉल चाहत्यांची माफी; पहा नेमके काय घडले?

फुटबॉल चाहत्यांना JIO अ‍ॅप आणि वेबसाईटचा वापर केल्याने लाइव्ह स्ट्रीमींगचा दर्जा घसरल्याचं आणि अनेक तांत्रिक अडचणींचा वेगळाच सामना चाहत्यांना करावा लागाला. यासंदर्भात चाहत्यांनी सोशल मीडियावरुन थेट नाराजी व्यक्त करत रिलायन्स ‘जिओ’कडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    कतार येथे जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेला काल पासून सुरुवात झाली आहे. रविवारी २० नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा पहिला सामना यजमान कतार विरुद्ध इक्वेडोर त्यांच्यात खेळवण्यात आला. अल बायत स्टेडियममध्येहा सामना खेळवण्यात आला असून विश्वचषकातील पहिला सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होती. तर कतार येथे प्रत्यक्ष उपस्थित न राहू शकलेल्या फुटबॉल चाहत्यांनी हा सामना ओटीटी प्लॅटफॉर्म, टीव्ही तसेच जिओ टीव्ही इत्यादींच्या माध्यमातून पाहिला मुकेश अंबानींच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या ‘जिओ’ सिनेमा या मोफत अ‍ॅपवरुन थेट प्रक्षेपित करण्यात आला.

    वेबसाईटवरही हा सामना मोफत दाखवण्यात आला. मात्र मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल चाहत्यांना या अ‍ॅप आणि वेबसाईटचा वापर केल्याने लाइव्ह स्ट्रीमींगचा दर्जा घसरल्याचं आणि अनेक तांत्रिक अडचणींचा वेगळाच सामना चाहत्यांना करावा लागाला. यासंदर्भात चाहत्यांनी सोशल मीडियावरुन थेट नाराजी व्यक्त करत रिलायन्स ‘जिओ’कडे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    वेगवान इंटरनेट कनेक्शन असलेल्यांनाही हे सामने लाइव्ह पाहताना अडचणी आल्या अनेक चाहत्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील नाराजी व्यक्त केली आहे. विश्वचषक पाहण्याचा सर्व उत्साह या गोंधळामुळे मावळल्याचं सांगत अनेकांनी या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘जिओ’नेही ट्वीटरवरुन या तक्रारींची दखल घेतल्याचं ट्विटरवर दिसून आलं. आमची टीम या तांत्रिक अडचणीवर काम करत असून बफरींगसंदर्भातील समस्या सोडवत आहोत असं सामना सुरु असताना पोस्ट केलं होतं. ‘जिओ’ने ट्विटरवरुन “प्रिय जिओसिनेमा चाहत्यांनो, तुम्हाला सामन्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. तुम्ही तुमचं अ‍ॅप अपडेट करुन फिफा विश्वचषक कतार २०२२ चा आनंद गेऊ शकता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व,” अशी पोस्ट केली.