
भारताच्या संघाने प्रत्युत्तरात अवघ्या ६.१ षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या विजयाचा 'सूपरहिरो' ठरला होता.
आशिया चषक २०२३ : आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये अंतिम सामना पार पडला आणि आशिया चषक २०२३ चा खिताब आता भारताच्या नावावर झाला आहे. आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताच्या संघाने श्रीलंकेचा डाव ५० धावांवर धावांवर गुंडाळला. भारताच्या संघाने श्रीलंकेला ५० धावांवर ऑल आऊट केलं. भारताने १५.२ ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारतासाठी धोकादायक गोलंदाजी केली. त्याने ७ षटकात २१ धावा देत ६ बळी घेतले. सिराजनेही मेडन ओव्हर टाकले.
भारतीय गोलंदाजांचा समोर श्रीलंकेचा संघ पुरता ढासळला. सिराजने भेदक मारा करत सात विकेट घेतले. तर, हार्दिक पांड्यानेही तीन गडी बाद केले. हार्दिक पांड्याने २.२ षटकात ३ धावा देत ३ बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेतली. त्याने ५ षटकात २३ धावा दिल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक १७ धावा केल्या. हेमंताने १३ धावा केल्या. आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० गडी राखून पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. टीम इंडियाने श्रीलंकेला ५० धावांवर ऑलआउट केलं.
भारताच्या संघाने प्रत्युत्तरात अवघ्या ६.१ षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं. मोहम्मद सिराज टीम इंडियाच्या विजयाचा ‘सूपरहिरो’ ठरला होता. सिराजने ७ विकेट घेतल्या. तर शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या सलामी जोडीनं फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शुभमन गिलने नाबाद २७ तर ईशान किशनने नाबाद २३ धावा केल्या. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेवर वर्चस्व गाजवलं.