आजपासून आशिया कपच्या क्रिकेट सामान्यांना सुरुवात

    संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेल्या ‘आशिया कप २०२२’ (Asia Cup) या टी २० स्पर्धेला आज पासून सुरुवात होणार आहे. यंदा आशिया कप हा यूएई मध्ये खेळवला जाणार असून यात तब्बल सहा संघांचा समावेश असेल. या स्पर्धेचा पहिला सामना यजमान श्रीलंका (Shri Lanka) आणि अफगाणिस्तान (Afganisthan) यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. आशियातील सर्वोत्तम क्रिकेट संघ या स्पर्धेत एकमेकांशी मैदानावर भिडणार असल्यामुळे यंदा आशिया कप मध्ये अनेक रोमांचकारी सामने प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

    २७ ऑगस्ट रोजी आशिया कपचे बिगुल वाजणार असले तरी २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या हायव्होल्टेज सामान्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रविवारी २८ ऑगस्टला भारत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी भिडणार आहे. खरंतर यंदा आशिया कप ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती परंतु तेथे मोठी उलथापालथ झाल्यामुळे ही स्पर्धा यूएईत खेळवली जाणार आहे. यात ग्रुप अ मध्ये भारत(India) , पाकिस्तान (Pakistan), हाँगकाँग (Hongkong) यांचा समावेश आहे तर ग्रुप ब मध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.

    सर्वप्रथम दोन्ही ग्रुप मधील संघ आपल्या ग्रुप मधील संघांसोबत सामने खेळतील. त्यानंतर सर्वाधिक गुण संख्या मिळवलेले दोन्ही ग्रुप मधील संघ उपांत्य आणि अंतिम फेरीत आमनेसामने येतील. यंदा बहुतेक संघातील अनुभवी खेळाडू हे दुखापत ग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत अनेक संघांमध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली असून आशिया कप स्पर्धेत ते काय कमल दाखवणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

    आशिया कपसाठी भारतीय संघ :
    रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

    असं आहे आशिया कप वेळापत्रक :
    २७ ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
    २८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान
    ३० ऑगस्ट – बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान
    ३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध हाँगकाँग
    १ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश
    २ सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग

    सुपर ४ लढती :
    ३ सप्टेंबर – B1 वि B2
    ४ सप्टेंबर – A1 वि A2
    ६ सप्टेंबर – A1 वि B1
    ७ सप्टेंबर – A2 वि B2
    ८ सप्टेंबर – A1 वि B2
    ९ सप्टेंबर – B1 वि A2