आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर, स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताकडे ११ सुवर्ण

आशियाई क्रीडा स्पर्धाची १९ वी आवृत्ती २३ सप्टेंबरपासून सुरू झाली आणि ८ ऑक्टोबरपर्यंत चालेल. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) द्वारे आयोजित केलेल्या बहु-क्रीडा कार्यक्रमात आशिया खंडातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंना एकत्र आणले जाते.

    आशिया क्रीडा स्पर्धेतील पदके : आशियाई खेळ २०२३ चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ हँगझोऊ येथे सुरु असलेल्या खेळांमध्ये भारत दमदार कामगिरी करत आहे. आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारतीय संघाने आज चार पदके जिंकली आहेत. त्याने एक सुवर्ण, दोन रौप्य पदके आणि एक कास्य पदक जिंकले आहे. भारत सध्या पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर एकूण ११ सुवर्ण, १६ रौप्य आणि १४ कांस्य पदके आहेत.

    आशियाई क्रीडा स्पर्धाची १९ वी आवृत्ती २३ सप्टेंबरपासून सुरू झाली आणि ८ ऑक्टोबरपर्यंत चालेल. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया (OCA) द्वारे आयोजित केलेल्या बहु-क्रीडा कार्यक्रमात आशिया खंडातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंना एकत्र आणले जाते. भारतातील ६६५ खेळाडू ३९ खेळांमध्ये इतर राष्ट्रांतील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करतील. आशियाई खेळांमध्ये भारताचा भक्कम इतिहास आहे, त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आणि विविध खेळांमध्ये अनेक पदके जिंकली. २०१८ मध्ये जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या मागील स्पर्धेत भारताने ७० पदके जिंकली, त्यापैकी १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्य पदके होती.

    मेडलच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर चीन आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कोरिया आहे.त्याचबरोबर तिसऱ्या स्थानावर जपान आहे आणि चौथ्या स्थानावर भारत आहे. भारताने आतापर्यत ४२ पदके पटकावली आहेत.