
मिश्र दुहेरीचा अंतिम सामना IST सकाळी ७:३० नंतर सुरू होणार आहे आणि तो भारतात थेट प्रवाह आणि टेलिकास्टवर उपलब्ध असेल.
आशियाई खेळ २०२३ : आशियाई खेळ २०२३ मध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये भारत आणि तैवान यांच्यामध्ये सकाळी फायनलचा सामना पार पडला. साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन या भारतीय जोडीला यु-ह्सिओ हसू आणि जेसन जंग यांच्याकडून सरळ सेटमध्ये ४-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला आणि रौम्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय जोडीने सेओंगचान हॉंग आणि सूनवू क्वोन या कोरियन जोडीचा ६-१, ६-७(६),१०-० असा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर यु-ह्सिओ हसू आणि जेसन जंग यांनी थायलंडच्या प्रुच्य इसारो आणि पॅरापोल या जोडीचा पराभव केला.
फायनलमध्ये, तैवानने चांगली सुरुवात करून, पाचव्या गेममध्ये सर्व्हिसच्या ब्रेकमुळे 35 मिनिटांत ६-४ असा पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मायनेनीने नवव्या गेममध्ये सर्व्हिस सोडत तैवानला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून सामना ६-४, ६-४ असा एक तास १२ मिनिटांत गुंडाळला. भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले शनिवारी चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना येथील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा २०२३ टेनिस मिश्र दुहेरी सुवर्णपदक लढतीत चिनी तैपेई जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांच्याशी खेळतील .
मिश्र दुहेरीचा अंतिम सामना IST सकाळी ७:३० नंतर सुरू होणार आहे आणि तो भारतात थेट प्रवाह आणि टेलिकास्टवर उपलब्ध असेल. अंतिम फेरीत जाताना, रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत उझबेकिस्तानच्या अकगुल अमानमुराडोवा-मॅक्सिम शिन यांचा ६-४, ६-२ असा पराभव केला. भारतीय टेनिस जोडीने त्यानंतर १६ च्या फेरीत अयानो शिमिझू-शिंजी हाजावा जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव केला आणि उपांत्यपूर्व फेरीत कझाकच्या झिबेक कुलंबायेवा-ग्रिगोरी लोमाकिन जोडीचा ७-५, ६-३ असा पराभव केला.