आशियाई खेळात भारताचे मिशन पूर्ण, चौदाव्या दिवशी भारताने मिळवली १०६ पदक

भारताच्या कब्बडी महिला संघाने चायनीज तैपेईचा पराभव करत भारताला १०० वे पदक मिळवून दिले आणि इतिहास रचला.

    आशियाई क्रीडा मेडल टॅली : आशियाई खेळाच्या चौदाव्या दिवशी भारताला अदिती गोपीचंदने महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्यपदक मिळवून दिले. त्यांनतर महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजीमध्ये ज्योती सुरेखा हिने आज भारताला सकाळी सुवर्णपदक मिळवून दिले. भारताने यंदाच्या तिरंदाजीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारताचा ओजस प्रवीण देवतळे याने पुरुषांच्या कंपाउंड तिरंदाजीत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याचबरोबर ओजस देवतळे यांच्या विरुद्ध भारताचाच तिरंदाज अभिषेक वर्माने रौप्यपदक पटकावले.

    भारताच्या कब्बडी महिला संघाने चायनीज तैपेईचा पराभव करत भारताला १०० वे पदक मिळवून दिले आणि इतिहास रचला. भारताचा दमदार डुओ चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांनी भारताला पुरुष दुहेरीमध्ये स्पर्धेमध्ये सुवर्ण मिळवून दिले. दीपक पुनियाने पुरुषांच्या फ्रीस्टाइल ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या जावरेल शापिएव्हचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतु पुरुषांच्या फ्रीस्टाइल ८६ किलो गटात यशला ताजिकिस्तानच्या मॅगोमेटकडून पराभव पत्करावा लागला.

    भारताच्या महिला हॉकी संघाला चीनकडून उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महिला हॉकी संघाने जपान विरुद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवून कास्य पदकावर कब्जा केला. पुरुषांच्या अंतिम फेरीत भारताने इराणचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. तर भारताच्या पुरुषांच्या अंतिम फेरीत भारताने सुवर्णपदक जिंकले. भारताने यंदाच्या आशियाई खेळामध्ये १०० पदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याचबरोबर भारतीय पुरुष बुद्धिबळ संघाने आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. विदित, अर्जुन आणि हरिकृष्ण पी यांच्या संघाने फिलीपिन्सविरुद्ध आपापल्या फेरीच्या ९ सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवले. भारताने रौप्यपदक जिंकले आहे, तर इराणने बुद्धिबळात सुवर्णपदक पटकावले आहे.