ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर 66 धावांनी विजय, भारताचा 286 धावांवर आटोपला खेळ, कर्णधार रोहित शर्माची खेळी व्यर्थ

आज भारतीय संघाच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करीत कांगारूंनी टीम इंडियासमोर धावांचा डोंगर उभा केला. भारताला विजयासाठी 353 धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेटवर 353 धावा केल्या. आता भारतीय संघांच्या फलंदाजांची मोठी कसोटी लागणार आहे.

  राजकोट/सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 353 धावांचे अवघड लक्ष्य ठेवले असताना भारताला हे मोठे आव्हान पेलले नाही. भारताचा सर्व डाव 286 धावांवर आटोपला. कर्णधार रोहित शर्माची 81 धावांची खेळी व्यर्थ ठरली. विराट, श्रेयस, रवींद्र जडेजा वगळता एकही फलंदाज प्रभाव टाकू शकला नाही.

  ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत, आतापर्यंत 46 ओव्हरमध्ये 6 विकेटवर 328 धावा केल्या आहेत. सलामीला आलेल्या डेव्हीड वॉर्नर आणि मायकेल मार्शने चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने शतकी भागिदारी केली. त्यानंतर आलेल्या मायकेल मार्शनेसुद्धा संघाच्या धावसंख्येत मोठी भर टाकली. त्याने 61 चेंडूत 74 धावा केल्या. त्यानंतर आलेला मार्नस लाबुनशिंगे सध्या 64 धावांवर खेळत आहे.

  कांगारूंची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी

  अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दणक्यात सुरुवात करत हा निर्णय सार्थ ठरवला. मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी वादळी सुरुवात केली. आठ षटकत दोघांनी ७८ धावांची सलामी दिली. डेविड वॉर्नर ५६ धावांवर तंबूत परतला. वॉर्नरने चार षटकार आणि सहा चौकारंच्या मदतीने ३४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथनेही वेगाने धावा केल्या. स्मिथ आणि मिचेल मार्श यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली. दोघेही वेगाने धावा काढत होते.

  मिचेल मार्श बाद झाल्यानंतर धावसंख्या मंदावली

  अखेर कुलदीप यादव याने मिचेल मार्श याला ९६ धांवावर बाद करत जोडी फोडली. मिचेल मार्शने १३ चौकार आणि तीन षटकार ठोकले. मार्श बाद झाल्यानंतर स्मिथही तंबूत परतला. स्मिथने ६१ चेंडूत झटपट ७४ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि आट चौकारांचा समावे होता.

  स्मिथ आणि मार्श तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. पण दुसऱ्या बाजूने लाबूशेन चिवट फलदाजी करत होता. अॅलेक्स कॅरी ११ धावांवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही पाच धावा काढून तंबूत परतला. विस्फोटक कॅमरुन ग्रीन यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कॅमरुन ग्रीन नऊ धावांवर बाद झाला. दुसरीकडे मार्नस लाबूशेन याने अखेरपर्यंत झुंज दिली. ४९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लाबुशेन बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या नादात लाबुशेन बाद झाला. त्याला बुमराहने तंबूत धाडले. लाबुशेन याने फक्त ५८ चेंडूत वेगाने ७२ धावा जोडल्या. यामध्ये नऊ चौकारांचा समावेश होत. अखेरीस पॅट कमिन्स याने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धवसंख्या ३५० पार नेली.

  भारताच्या वेगवान गोलंदाजांना चांगलाच मार बसला. बुमराह आणि सिरजही ऑस्ट्रेलियाच्या तडाख्यातून वाचले नाहीत. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या पण त्यासाठी धावाही खर्च केल्या. बुमराहने दहा षटकात तब्बल ८१ धावा खर्च केल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने पाच षटकात ४५ धावा दिल्या. मोहम्मद सिराजने ९ षटकात ६८ धावा दिल्या. सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. रविंद्र जाडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांना विकेट मिळाली नाही, पण त्यांनी भेदक मारा केला. कुलदीप यादव याने सहा षटकात ४८ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला आज निर्धाव षटक फेकता आले नाही.

  अलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन यांना आज अपयश आले. मैदानाच्या पिचवर येऊन त्यांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केले. आज ऑस्ट्रेलिया टीममधील वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली.

  भारतीय संघ : रोहित शर्मा (क), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

  ऑस्ट्रेलिया संघ : मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड