ऑस्ट्रेलियाचा भारतावर 21 धावांनी विजय, मालिका 2-1 ने खिशात; विजयासह आयसीसी रँकिंगमध्ये कांगारु ‘या’ स्थानावर…तर टिम इंडियाला फटका

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाला 49 षटकांत अवघ्या 269 धावांवर डाव गुंडाळावा लागला. त्यानंतर अ‌ॅडम झंपा 4/45) आणि एगरने शानदार गोलंदाजीतून टीम इंडियाचा 248 धावांत खुर्दा उडाला. भारताला घरच्या मैदानावर मालिका पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. कोहलीने (54) अर्धशतकी खेळी केली.

चेन्नई– रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात मालिकेतील तिसरा व निर्णायक वनडे सामना (ODI Match) खेळवला गेला. या निर्णायक सामन्यात कांगारुंनी भारतावर 21 धावांनी विजय (Win) मिळवला आहे. तर मालिका 2-1 ने जिंकून मालिका देखील खिशात घातली आहे. भारताच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा भ्रमनिराशा केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 270 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 49.1 ओव्हरमध्ये 248 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाला या पराभवासह मोठा झटका बसला आहे. आयसीसीने टीम इंडियाला झटका दिला आहे. या पराभवामुळं टीम इंडियाच्या आयसीसी रॅंकींगवर परिणाम झाला आहे. तर सोपा विजय भारताने अवघड करत शेवटी पराभव स्विकारल्यामुळं क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत.

भारताचा विजयीरथ कांगारुंनी रोखला…

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाला 49 षटकांत अवघ्या 269 धावांवर डाव गुंडाळावा लागला. त्यानंतर अ‌ॅडम झंपा 4/45) आणि एगरने शानदार गोलंदाजीतून टीम इंडियाचा 248 धावांत खुर्दा उडाला. भारताला घरच्या मैदानावर मालिका पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. कोहलीने (54) अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार रोहितसह (30), शुभमन (37), राहुल (32), हार्दिकचा (40) खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने 2019 नंतर पुन्हा एकदा भारताच्या सत्रातील सलग मालिका विजयाच्या मोहिमेला ब्रेक लावला. कांगारुंनी भारत दौऱ्याचा शेवट गोड करत एकदिवसीय मालिक जिंकली, तर कसोटीत त्यांना 2-1 अशी हार पत्करावी लागली आहे.

कांगारुंनी पटकावले अव्वल स्थान

या विजयानंतर ऑस्ट्रेलिया 35 सामन्यात 113 रेटिंग्ससह ओडीआय रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली आहे. तर टीम इंडिया 47 मॅच आणि 113 रेटिंग्स पॉइंट्सने दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाने या मालिका पराभवासह एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी अर्थात ओडीआय रँकिंगमधील अव्वल स्थान गमावलं आहे. टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर आता ऑस्ट्रेलियाने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.