भारतासमोर ऑस्ट्रेलियाने उभे केले 254 धावांचे लक्ष्य, टीम इंडिया बनणार का सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 विकेट गमावत 253 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियासमोर 253 धावांचे लक्ष्य आहे.

    अंडर -19 क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी सुरु आहे. दोन संघांमधील अंतिम सामना बेनोनी येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 विकेट गमावत 253 धावा केल्या. अशा प्रकारे टीम इंडियासमोर 253 धावांचे लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक धावा केल्या.

    हरजस सिंगने 64 चेंडूत 55 धावा केल्या. ह्यू वायबगेनने 66 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. याशिवाय ऑलिव्हर पीकने शेवटच्या षटकांमध्ये 43 चेंडूत 46 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. राज लिंबानी 10 षटकांत 38 धावांत 3 फलंदाज बाद केले. नमन तिवारीला 2 यश मिळाले. याशिवाय सौमी पांडे आणि मुशीर खान यांनी 1-1 कांगारू फलंदाज बाद केले.