shane warne

ऑस्ट्रेलियाचा(Australia) ५२ वर्षीय माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) त्याच्या मुलासोबत बाईकवरून( Shane Warne Injured In Bike Accident) जात असताना पडला आणि १५ मीटरपर्यंत फरफटत गेला.

    कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचा(Australia) ५२ वर्षीय माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne)बाईक अपघातात जखमी झाला आहे. वॉर्न त्याच्या मुलासोबत बाईकवरून( Shane Warne Injured In Bike Accident) जात असताना पडला आणि १५ मीटरपर्यंत फरफटत गेला. अपघातानंतर शेन वॉर्नने सांगितले की, त्याला खूप खरचटले आहे आणि जखमा झाल्या आहेत. मात्र शेन वॉर्नला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, परंतु जेव्हा तो सकाळी उठला तेव्हा त्याला खूप वेदना जाणवत होत्या. त्यानंतर तो रुग्णालयात गेला. तिथे त्याने फ्रॅक्चर झालं आहे का, याची तपासणी केली. मात्र त्याला कोणतेही फ्रॅक्चर झालेलं नाही.

    शेन वॉर्न लवकरच समालोचन करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. शेन वॉर्न हा जगातील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने ८०० बळी घेतले. त्याचबरोबर वॉर्नने १९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाच्या नावावर १३१९ विकेट्स आहेत. शेन वॉर्नने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.