India vs Australia T20 Series

  India vs Australia T20 Series : रायपूर येथे सुरू असलेल्या यांच्यातील चौथा सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मागील सामन्यात भारताने मोठी धावसंख्या उभारल्यानंतरसुद्धा पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाने या मालिकेत आतापर्यंत 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता रायपूरमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचे खेळाडू लवकर बाद होत आहे. टीम इंडियाने 8 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 63 धावा केल्या आहेत.

  यशस्वी जयस्वाल आणि रुतुराज गायकवाड ही टीम इंडियाची सलामी जोडी मैदानात उतरल्यानंतर त्यांनी चांगली सुरुवात केली, परंतु यशस्वी 37 धावा केल्यानंतर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र श्रेयस आणि सूर्या पटापट आऊट झाल्याने टीम इंडियावर मोठा दबाव वाढला. परंतु, नुकत्याच आलेल्या रिंकूने फटकेबाजीची सुरुवात करीत टीम इंडियाचा धावफलक हलता ठेवला. दुसरीकडे सेट उपकर्णधार रुतुराज गायकवाडने धमाकेदार स्ट्रोक खेळत धावसंख्या चांगलीच पळवली.

  भारताने ऑस्ट्रेलियावर 20 धावांनी विजय मिळवला आहे. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात अक्षरने जबरदस्त गोलंदाजी करीत कांगारूनना 174 धावांवर थांबवले. कांगारूंकडून आज फलंदाजी घसरतच राहिली यात टीम इंडियाच्या गोलंदाजांचे मोठे योगदान आहे.

   

  भारताचा संपूर्ण संघ
  भारत (IND): सूर्यकुमार यादव (c), रुतुराज गायकवाड (vc), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, दीपक चहर, श्रेयस अय्यर

  ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ
  ऑस्ट्रेलिया (AUS): मॅथ्यू वेड (c), आरोन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा