कांगारुंनी सहाव्यांदा जिंकला वर्ल्डकप; अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय, काय आहे यशाचे गमक?

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने अनुभवी बेथ मूनी हिच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर 157 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले. पण 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकल्यानं त्यांचा 19 धावांनी पराभव झाला. आणि पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. ए

केपटाऊन– आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (Womens T20 WC) स्पर्धेत रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात कांगारुंनी (Australia) दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) दणदणीत 19 धावांनी मात करत सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. यामुळं ऑस्ट्रेलिया महिला संघाने एक वेगळा विक्रम करत इतिहास घडवला आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर एकूण सहाव्यांदा महिला टी-२० विश्वचषक आपल्या नावे करत कांगारुनी पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व असल्याचं सिद्ध केले.

द.आफ्रिकेला विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य…

दरम्यान, नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने अनुभवी बेथ मूनी हिच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर 157 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले. पण 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकल्यानं त्यांचा 19 धावांनी पराभव झाला. आणि पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. एल वोल्वार्डने 48 चेंडूत 61 धावा केल्या. 17व्या षटकात ती बाद होताच दक्षिण आफ्रिकेच्या आशाही संपुष्टात आल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड हिने 61 धावांनी एकहाती झुंज दिली. पण तिला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकला. कांगारुंनी सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

विश्वचषक जिंकण्याची हॅट्ट्रिक…

ऑस्ट्रेलिय महिला संघ आधिक आक्रमपणे खेळतो, तसेच प्रतिस्पर्धा संघावर दबाव टाकण्याचा सतत त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळं त्यांना यश मिळतं असं क्रिकेटतज्ज्ञांचे मत आहे. ह्या वर्षीचा विश्वचषक जिंकत कांगारुंनी सलग तिसऱ्यांदा व एकूण सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियन संघ यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्यांदा महिला टी-20 विश्वचषकात विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. यापूर्वी या संघाने 2010, 2012, 2014 मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, आता 2018, 2020 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावले आहेत. असा पराक्रम करणारा कांगारुंचा महिला संघ पहिलाच आहे. पहिल्यांदाच एखाद्या संघाने पुरुष किंवा महिला क्रिकेटसह आयसीसी स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यामुळं क्रिकेटमध्ये पुरुषासह महिलांचा देखील दबदबा आहे.