रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही न्यूझीलंडचा निसटता पराभव, गुणतालिकेत पुन्हा बदल

    धर्मशाला/हिमाचल प्रदेश : विश्वचषकातील 27 व्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडबरोबर झालेल्या रोमांचक सामन्यात अस्ट्रेलियाचा अखेरीस 5 धावांनी विजय झाला. यामध्ये न्यूझीलंडने शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

    न्यूझीलंडची खेळी

    न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र या तरुण तडफदार फलंदाजाने धमाकेदार खेळी करीत 89 चेंडूत 116 धावा केल्या. न्यूझीलंडला विजयाच्या दारापर्यंत नेण्याचे काम रचिन रवींद्र याने केले. त्यानंतर डेरी मायकेल आणि जेम्स नीशम यांनी न्यूझीलंडसाठी धावसंख्येत भर टाकली. शेवटपर्यंत चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडचा निसटता पराभव झाला.

    ऑस्ट्रेलियाची खेळी

    प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातच धमाकेदार झाल्याने त्यांनी न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभा केला. सलामीला आलेल्या डेव्हीड वॉर्नर आणि हेडने 175 धावांची मोठी भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून कोणीही चांगले खेळू शकले नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांपैकी फिलिप्सने 3 विकेट घेतल्या, त्यानंतर बोल्टने 3 विकेट घेतल्या.