पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 4 विकेट्सनी विजय

कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक आणि वेड-स्मिथच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सनी सामना जिंकला. 

    भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)दरम्यान टी20 मालिकेला कालपासून (21 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. मात्र, या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतानं खराब सुरुवात केली. भारतानं दिलेल्या 209  धावाचं लक्ष पुर्ण करत ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्सनी भारताचा दणदणीत पराभव केला.

    भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-20 मालिका सुरु होताच नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भारतानकडून केएल राहुल, हार्दीक यांनी अर्धशतक करत 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले. दरम्यान, भारताच्या २०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. या सामन्यान ऑस्ट्रेलियानेही सुरुवातीपासून कमाल फलंदाजीच प्रदर्शन केल. कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक आणि वेड-स्मिथच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सनी सामना जिंकला.