सामन्यादरम्यान अचानक घुसणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक, खलिस्तानी दहशतवादी संघटना त्याला देणार 10 हजार डॉलर्सचं बक्षीस!

विराट कोहलीला ग्राऊंडवर जाऊन भेटणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिक वेन जॉन्सनला खलिस्तानी दहशतवादी संघटना 10 हजार डॉलर्सचे बक्षीस देणार आहे.

  रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final 2023) सुरू असताना अचानक एक व्यक व्यक्ती मैदानात घुसला होता. त्याने विराट कोहलीला मागुन पडकले होते. या व्यक्तीची ओळख पटली असून तो ऑस्ट्रेलियन नागरिक वेन जॉन्सनला (wayne johnson) असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र, या सगळ्या प्रकरामध्ये  प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी गट SFJ () ने उडी घेतली असून SFJ चा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने त्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला 10 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. एका व्हिडिओमध्ये पन्नूने भारताविरुद्ध विषही ओतले असून खलिस्तानचे समर्थन केले आहे.

  नेमका प्रकार काय

  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये सुरक्षेतील त्रुट पाहायला मिळाली होती. एका पॅलेस्टाईन समर्थन करत एका ऑस्ट्रेलियन नागरिक थेट मैदानात घुसला होता. त्याने विराट कोहलीला मागून येऊन पकडले होते. तो ‘फ्री पॅलेस्टाईन’ टी-शर्ट घालून मैदानावर पोहोचला होता. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  शीख फॉर जस्टिस संघटनेकडून वेन जॉन्सनला बक्षिस

  मात्र, या सगळ्या प्रकारा आता भारताविरोधी आग ओकणाऱ्या SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने एन्ट्री केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन नागरिक वेन जॉन्सनला 10 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. एका व्हिडिओमध्ये पन्नूने भारताविरुद्ध विषही ओतले असून खलिस्तानचे समर्थन केले आहे. तो म्हणाले की, मैदानावर पोहोचून जॉन्सन यांनी गाझा आणि पॅलेस्टाईनबाबत भारताची भूमिका उघड केली आहे. यासाठी SJI जॉन्सनला 10 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर करतो. आम्ही जॉन्सनच्या पाठीशी उभे आहोत. खलिस्तान आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणाबाजीही केली.
  अंतिम सामन्यापूर्वी पन्नूने व्हिडीओ जारी केला होता.