वाईट बातमी! पंजाब किंग्सला दुहेरी झटका, कर्णधार शिखर धवनला दुखापत

कालच्या सामन्यात शिखरला दुखापत झाल्यानंतर सॅम कुरनने राजस्थानविरुद्ध पंजाब किंग्जची कमान सांभाळली.

    काल पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. यामध्ये पंजाब किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला. नुकताच संघाला दुहेरी धक्का बसला आहे. आता पंजाबचा कर्णधार शिखर धवनबद्दल वाईट बातमी समोर आली आहे. कालचा राजस्थानविरुद्ध पार पडलेल्या सामन्यांमध्ये शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता याच संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. या अपडेट मध्ये असे सांगण्यात आले आहे की, शिखर धवन फक्त एका सामन्यातून नाही तर आयपीएल २०२४ च्या पुढील काही सामन्यांमधून बाहेर असणार आहे. कालच्या सामन्यात शिखरला दुखापत झाल्यानंतर सॅम कुरनने राजस्थानविरुद्ध पंजाब किंग्जची कमान सांभाळली.

    धवनच्या दुखापतीबाबत पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर यांनी सांगितले की, “खांद्याला दुखापत झाल्यामुळे आम्हाला त्याची उणीव जाणवली. त्यामुळे पुढील काही सामन्यांसाठी तो बाहेर राहू शकतो असे मी म्हणेन. “आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि तो उपचारांना कसा प्रतिसाद देतो ते पहावे लागेल, परंतु आत्ता असे दिसते आहे की तो पुढील 7 ते 10 दिवसांसाठी बाहेर असू शकतो.”

    यंदाच्या सीझनमध्ये पंजाब किंग्स आयपीएल २०२४ च्या या सीझनमध्ये आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांची स्थिती खूपच वाईट आहे. या पंजाबची अवस्था वाईट आहे. संघाने आतापर्यत ६ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना फक्त २ सामने जिंकता आले आहेत. संघाने आयपीएल 2024 ची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा ४ गडी राखून पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धचे पुढील दोन सामने संघ हरला. त्यानंतर पुढच्या सामन्यात संघाने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला. यानंतर हैदराबाद आणि राजस्थानविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला.