Cricket World Cup 2023 :श्रीलंकेची खराब सुरुवात अवघ्या तीन धावांत गमावल्या चार विकेट ; ३५८ धावांचे लक्ष्य

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३३वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. हे तेच मैदान आहे जिथे १२ वर्षांपूर्वी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता.

    Cricket World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील ३३वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. हे तेच मैदान आहे जिथे १२ वर्षांपूर्वी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला होता. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला होता.
    ३५८ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची खराब सुरुवात, अवघ्या तीन धावांत गमावल्या चार विकेट
    मोहम्मद सिराजने कुसल मेंडिसला बाद केले. आता श्रीलंकेची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात ७ धावा आहे. श्रीलंकेचे ३ फलंदाज शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. मोहम्मद सिराजला आतापर्यंत ३ यश मिळाले आहे. तर जसप्रीत बुमराहच्या नावावर १ विकेट आहे.
    भारतीय संघ World Cup 2023 साठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. सध्याच्या भारतीय संघाची कामगिरीही त्याला साजेशी अशीच असल्याचे दिसून येत आहे. भारत  World Cup 2023 मधील सातवा विजय नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे.  या विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात श्रीलंकेला विजय आवश्यक असतानाही त्यांची कामगिरी खराब दिसली. हा संघ  पराभूत झाल्यास संघाचे स्थान धोक्यात येईल.