NADA आणि WWU च्या कारवाईवर बजरंग पुनिया 31 डिसेंबर 2024 पर्यत निलंबित, काय म्हणाला बजरंग

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयानंतर, जागतिक कुस्ती संघटना UWW ने बजरंग पुनियाला तात्पुरते निलंबित केले.

    बजरंग पुनिया : टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाचा (Bajarang Punia) त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीची बजरंग पुनिया अडचणींना सामोरे गेला. त्यांनतर आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय आशांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयानंतर, जागतिक कुस्ती संघटना UWW ने बजरंग पुनियाला तात्पुरते निलंबित केले होते. परंतु आता ही शिक्षा वर्षाच्या शेवटपर्यत ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या निर्णयानंतर, जागतिक कुस्ती संघटना UWW ने बजरंग पुनियाला तात्पुरते निलंबित केले.

    काय म्हणाला बजरंग पुनिया?
    हे स्पष्ट करण्यासाठी आहे की, मी कोणत्याही टप्प्यावर डोपिंग नियंत्रणासाठी माझा नमुना देण्यास नकार दिला नाही. 10 मार्च 2024 रोजी, जेव्हा माझ्याकडे कथित डोपिंग नियंत्रण अधिकाऱ्यांनी संपर्क साधला तेव्हा मी त्यांना फक्त आठवण करून दिली की मागील दोन वेळा ते माझे नमुने घेण्यासाठी आले होते, त्यांनी एकदाच कालबाह्य झालेल्या किट मिळवल्या होत्या…

    संपूर्ण प्रकरण काय?
    बजरंग पुनिया सोनिपतमधील ऑलम्पिक चाचण्यांमध्ये पराभूत झाला. तो दोन्ही ऑलम्पिक फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. भारताचा कुस्तीपटूंना अजुनपर्यत ६५ किलो वजनी गटामध्ये ऑलम्पिक कोटा जिंकला आला नाही. 23 एप्रिल रोजी , NADA ने बजरंग पुनियाला 10 मार्च रोजी सोनीपत येथे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणी दरम्यान लघवीचा नमुना देण्यास ‘नकार’ दिल्याबद्दल निलंबित केले .UWW रेकॉर्डनुसार, बजरंगला NADA द्वारे “कथित डोपिंग विरोधी नियमांचे उल्लंघन (ADRV) केल्याबद्दल “तात्पुरते निलंबित” केल्याबद्दल 31 डिसेंबर 2024 पर्यंत निलंबित करण्यात आले आहे.