बंगळुरूच्या आशा पावसात धुऊन निघतील की सामन्यात तणाव वाढणार!

बंगळुरूच्या हवामानावर प्रश्नचिन्ह! बंगळुरू प्लेऑफमधून बाहेर होणार की चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबादचा पत्ता कट करणार?

    बंगळुरू विरुद्ध चेन्नई : आयपीएल 2024च्या (IPL 2024) गुणतालिकेचा विचार केला तर कोलकाता नाईट राइडर्सचा (Kolkata Knight Riders) संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सच्या (Lucknow Super Giants) पराभवानंतर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे आता प्लेऑफमध्ये फक्त 2 संघांची स्थिती जागा शिल्लक आहे. यामध्ये आता कालच्या लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर त्यांच्या प्लेऑफच्या आशा मावळत चालल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians), पंजाब किंग्स (Panjab Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Taitans) हे संघ प्लेऑफमधून आधीच बाहेर झाले आहेत.

    या संघांमध्ये प्लेऑफसाठी चुरशीची लढत

    गुणतालिकेमध्ये सध्या प्लेऑफच्या जागा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघानी बुक केल्या आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये चुरशीची लढत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रत्येक १४ गुण आहेत तर बंगळुरूचे १२ गुण आहेत परंतु प्लेऑफसाठी दोन जागाच शिल्लक आहेत. उर्वरित दोन ठिकाणांबाबत असे सांगितले जात आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एक जागा मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबीला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोणत्याही किंमतीत पराभूत करावे लागेल. मात्र सामन्यापूर्वी हवामानामुळे चिंता वाढली आहे.

    जाणून घ्या सामन्याच्या दिवशी बेंगळुरूचे हवामान कसे असेल?

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या दिवशी बेंगळुरूमध्ये पावसाची 70 टक्के शक्यता आहे. ‘कर्नाटक वेदर’नुसार, 17 ते 21 मे दरम्यान बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. अशा परिस्थितीत सीएसके आणि आरसीबी यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पावसाचा धोका निर्माण झालेला दिसत आहे. पावसाने गुजरात टायटन्सचा खेळ खराब केला होता. गुजरातला केकेआरविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण पावसाने त्यांचा खेळ खराब केला, त्यामुळे संघ बाहेर पडला. RCB गुणतालिकेत 14 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे आणि +0.387 च्या निव्वळ धावगतीसह बेंगळुरूने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. अशा स्थितीत संघासाठी शेवटचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.