The wake came after the defeat in the T20 World Cup BCCI to adopt rotation policy

जय शाह (Jay Shah) यांनी म्हटलं आहे की, माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंच यांच्या मासिक पेन्शनमध्ये (Pension Hike For Former Cricketers And Monthly Pension) वाढ केल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. तब्बल ९०० क्रिकेटपटू आणि पंचांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) माजी भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंचांच्या पेन्शनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून भारताचे माजी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असल्याचे जाहीर केले आहे. बीसीसीआयच्या या नव्या निर्णयाचा ९०० क्रिकेटपटूंचा फायदा होणार आहे.

    जय शाह यांनी म्हटलं आहे की, माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंच यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ केल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. तब्बल ९०० क्रिकेटपटू आणि पंचांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. त्यामुळं जवळपास ७५ टक्के खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये १०० टक्के वाढ होईल.

    मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने पेन्शनसाठी चार स्लॅब बनवले आहेत. यापूर्वी ज्यांना १५ हजार रुपये पेन्शन मिळायची, त्यांच्या पेन्शनमध्ये १५ हजारांची वाढ करण्यात आली आहे. याचाच अर्थ आता त्यांना ३० हजार मिळणार आहेत. तसंच ज्यांना २२ हजार ५०० रुपये इतकी रक्कम मिळायची त्यांना आता ४५ हजार रुपये मिळणार आहे. याशिवाय ३० हजार पेन्शन असणाऱ्यांना आता ५२ हजार ५०० रुपये मिळतील आणि ३७ हजार ५०० रुपये मिळणाऱ्यांना ६०,००० रुपये देण्यात येतील. याशिवाय ५० हजार पेन्शन मिळत असलेल्या खेळाडू आणि पंचांना ७० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवी पेन्शन योजना १ जून २०२२ पासून लागू करण्यात येईल.