
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात BCCIच्या नव्या सिलेक्शन कमिटीनं पदभार स्वीकारला आहे. ७ जानेवारी या नव्या समितीची निवड करण्यात आलीय. नवी सिलेक्शन कमिटी रोहित आणि विराट यांच्या टी-20बाबत मोठा निर्णय घेण्याची किंवा त्याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
मुंबई: यापुढं विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना टी-20 सामन्यात धुवाधार बॅटिंग करताना कदाचित तुम्ही पाहू शकणार नाहीत. प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सना नमवणारे हे दोन क्रिकेटर्स म्हणजे टीम इंडियाचा प्राण आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र यापुढं या दोन्ही दिग्गज क्रिकेटर्सचं सिलेक्शन टी-20 मॅचमध्ये होणार नाही, असे संकेत भारतीय क्रिकेय नियामक आयोगाच्या (BCCI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. रोहित शर्माने आजच गुवाहाटीत होणाऱ्या श्रीलंकेसोबतच्या वन डे मॅचपूर्वी एक वक्तव्य केलंय. त्यात त्यानं टी-20साठी टीम इंडियाची कॅप्टन्सी सोडली नसल्याचं म्हटलंय. त्याच्या या वक्तव्यानंतर BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे संकेत दिले आहेत.
नवी सिलेक्शन कमिटी वेगळ्या निर्णयांच्या तयारीत
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वात BCCIच्या नव्या सिलेक्शन कमिटीनं पदभार स्वीकारला आहे. ७ जानेवारी या नव्या समितीची निवड करण्यात आलीय. नवी सिलेक्शन कमिटी रोहित आणि विराट यांच्या टी-20बाबत मोठा निर्णय घेण्याची किंवा त्याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. या दोन्ही प्लेअर्सनी टी-20च्या टीममध्ये निवड करण्यासाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BCCI टी-20 साठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात नवी युवा टीम तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.
हार्दिक पांड्या करणार टी-20चं नेतृत्व ?
श्रीलंकेविरोओधात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 च्या 3 मॅचच्या सीरिजमध्ये हार्दिक पांड्याने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्माकडून टी-20ची कॅप्टन्सी काढून घेऊन ही जबाबदारी हार्दिककडे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतय. रोहितसह विराट कोहलीही यापुढं टीम इंडियाच्या टी-20 च्या टीममध्ये असणार नाही, असंही सांगण्यात येतय. मात्र या दोघांचाही समावेश वन डे टीममध्ये असेल हेही स्पष्ट करण्यात आलंय.
विराट आणि रोहित हे सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्स
रोहित शर्माने 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर विराटनं २००८ साली श्रीलंकेविरोधातल्या मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. विराटनं टी-20 वर्ल्डकपसाठी टीमचं नेतृत्वही केलं, मात्र त्याला विजय मिळवता आला नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक रन्स करणाऱ्या क्रिकेटर्समध्ये त्याचा समावेश आहे.