जो कोरोनापासून वाचेल, तोच इंग्लंड दौऱ्यावर जाणार ; बीसीसीआयची कठोर भूमिका

मुंबईत (Mumbai ) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यास, कोणत्याही प्लेअरसाठी स्वतंत्र चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करण्यात येणार नसल्याचे, सर्व प्लेअर्सना कळविण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. आयपीएलमध्ये (IPL) प्लेअर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सीझन स्थगित करण्याची वेळ आल्याने, आता बीसीसीआय (BCCI) जादा खबरदारी बाळगत आहेत.

  मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर जाणार टीम इंडियाच्या (Team India) प्लेअर्सना कठोर निर्देश दिले आहेत. इंग्लंड दौऱ्यापूर्वी (England Visit)  जर कुणा प्लेअर कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याला टीममधून बाहेर ठेवण्यात येईल आणि त्याला इंग्लंड दोऱ्याला मुकावे लागले, अशी भूमिका भारतकीय क्रिकेट नियामक आयोगाने घेतली आहे. (BCCI) इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईत क्वारंटाईन होण्यापूर्वी, सर्व खेळाडूंनी काळजी घ्यावी, आयसोलेशनमध्ये म्हणजेच विलिगीकरणात राहावे, असा कठोर सल्ला टीम इंडियाचे फिजयो योगेश परमार यांनीही दिला आहे. १९ मेपासून टीम इंडिया बायो बबलमध्ये (Bio Bubble) एन्ट्री करणार आहे. त्यानंतर इंग्लंडला पोहचल्यावरही विराटची टीम १० दिवस क्वारंटाईन होणार आहे.

  हॉटेलमध्ये प्रवेश केल्यावर होणार कोरोना चाचणी

  बायो बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर टीम इंडियाचे प्लेअर्स, कर्मचारी यांची पहिल्याच दिवशी कोरोना चाचणी होणार आहे. याच्यासह टीम इंडियासाठी बीसीसीआय स्पेशल बायो बबल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. इंगंलंड टूरवर जाणारे २० प्लेअर्स हे वेगवेगळअया राज्यातले आहेत, आणि प्रत्येक राज्यात सध्या कोरोनाची वेगवेगळी परिस्थिती असल्याने बीसीसीआय कोणताही धोका घेऊ इच्छित नाही.

  कोणत्याही प्लेअरसाठी वेगळे चार्टर्ड प्लाईट नसेल

  मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह आल्यास, कोणत्याही प्लेअरसाठी स्वतंत्र चार्टर्ड प्लेनची व्यवस्था करण्यात येणार नसल्याचे, सर्व प्लेअर्सना कळविण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. आयपीएलमध्ये प्लेअर्स कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सीझन स्थगित करण्याची वेळ आल्याने, आता बीसीसीआय जादा खबरदारी बाळगत आहेत.

  इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी होणार दोनदा टेस्ट

  प्लेअर्स आणि त्यांच्या कुटुंबीयांच्याही टेस्ट करण्यात येणार आहेत. मुंबईहून इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी दोन टेस्ट करण्यात येणार आहेत. त्यात प्लेर्सना निगेटिव्ह यावे लागेल. बायो बबल नसतानाही प्लेअर्स निगेटिव्ह असल्याची खात्री करुन घेण्यात येणार आहे. खासगी कार किंवा विमानानेच प्रवास करण्याचे निर्देश प्लेअर्सना देण्यात आले आहेत. टूरवर जाणाऱ्या सर्व प्लेअर्सना कोविशिल्डची लस घेण्याचीच परवानगी देण्यात आली आहे. इथे पहिली लस घेतल्यानंतर, दुसरी लस इंग्लंडमध्ये मिळावी यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरु आहेत.

  इंग्लंडमध्ये सध्या एस्ट्रेजेनेकोची लस उपलब्ध आहे. जी कोविशिल्डचीच आवृत्ती आहे. त्यामुळे कोविशिल्डसाठी बोर्ड आग्रही आहे. विराट कोहली, अजिंक्य राहाणे, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या प्लेअअर्सनी पहिला डोस घेतला आहे, ज्या प्लेअर्सच्या शहरात कोविशिल्ड नसेल, त्यांनी तसे बोर्डाला सूचित करावे, सेही सांगण्यात आले आहे. बोर्ड त्यांना कोविशिल्डची लसस उपलब्ध करुन देणार आहे. भारतीय टीम सुमारे तीन महिने इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे.