सामन्याआधी कोलकाताचे खेळाडू पोहोचले देवाच्या आशीर्वादासाठी, फोटो व्हायरल

यंदाच्या सिझनला कोलकाता नाईट रायडर्स हा IPL 2024 मधील लीग टप्प्यातील सर्वोत्तम संघ होता.

    आयपीएलचा सिझन आता काही दिवसात संपणार आहे. यंदाच्या या आयपीएल 2024 च्या या सीझनमध्ये काही संघानी दमदार कामगिरी केली तर काही संघ प्लेऑफमध्ये सुद्दा पोहोचले नाही. परंतु यंदाच्या सिझनला कोलकाता नाईट राइडर्सने दमदार कामगिरी करत शर्यतीत शेवटपर्यत पहिल्या क्रमांकावर राहिले. यंदाच्या सिझनला कोलकाता नाईट रायडर्स हा IPL 2024 मधील लीग टप्प्यातील सर्वोत्तम संघ होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने साखळी टप्प्यात सर्वाधिक 9 सामने जिंकले, ज्यासह संघ टेबल टॉपर बनला.

    उद्या म्हणजेच 21 मे रोजी क्वालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद लढत होणार आहे. मात्र या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी कोलकाता नाईट राइडर्सचे अनेक खेळाडूंनी मंदिरात पोहोचून देवाचे आशीर्वाद घेतले आहे. हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यापूर्वी केकेआरचे अनेक खेळाडू गुवाहाटीतील ‘मां कामाख्या मंदिरात’ पोहोचले. मंदिरात पोहोचलेल्या खेळाडूंची यादी मोठी होती, ज्यात नितीश राणा, हर्षित राणा, रमणदीप सिंग आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासह काही खेळाडूंचा समावेश होता.

    क्वालिफायर सामान्यांचे वेळापत्रक

    क्वालिफायर 1 चा सामना 21 मे रोजी होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यातील पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी असेल. पराभूत संघ क्वालिफायर-2 खेळून अंतिम फेरीत प्रवेश करू शकेल. एलिमिनेटर सामना 22 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये होणार आहे. या सामान्यांमधील विजयी झालेला संघ क्वालिफायर 1 मधील पराभूत संघाशी सामना करेल तर पराभूत झालेला संघ शर्यतीतून बाहेर होईल.