
ENG vs NED : पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर काल झालेल्या इंग्लड विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात इंग्लडने १६० धावांनी नेदरलँड्सचा पराभव करीत धूळ चारली. यामध्ये बेन स्टोक्स शतकी खेळी करीत इंग्लडच्या विजयात मोलाची कामगिरी केली. त्याने ८४ चेंडूत १०८ धावांची मोठी खेळी करीत इंग्लडचा पहिला फलंदाज होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
Ben Stokes becomes first England player to score over 10,000 runs and 100+ wickets in international cricket
Read @ANI Story | https://t.co/mya94VHOwn#BenStokes #ODIWorldCup2023 #ENGvsNED #England pic.twitter.com/V4oGVbx1yq
— ANI Digital (@ani_digital) November 8, 2023
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४० व्या सामन्यात इंग्लंड संघाने नेदरलँड्सचा पराभव करून या स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला आहे. सलग सहा पराभवानंतर इंग्लिश संघाने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या विजयासह आता एकूण चार संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान या सामन्यात बेन स्टोक्सने शतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने ४७.५ षटकांत चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. स्टोक्सने अवघ्या ७८ चेंडूत आपले वनडेतील पाचवे आणि विश्वचषकातील पहिले शतक झळकावले. बेन स्टोक्सने ८४ चेंडूत ६ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने १०८ धावांची शतकी खेळी खेळली. आपल्या शतकी खेळीदरम्यान स्टोक्सने एक मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे.
आपला ११४ वा एकदिवसीय सामना खेळणारा बेन स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक विकेट्स घेणारा आणि १०,००० हून अधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंड संघाने १९२ धावांवर ६ विकेट गमावल्या असताना ३२ वर्षीय स्टोक्स फलंदाजीसाठी क्रीझवर आला. मात्र, त्यानंतर त्याने ख्रिस वोक्ससोबत सातव्या विकेटसाठी ८१ चेंडूत १२९ धावांची भागीदारी करत इंग्लंडला ३०० च्या पुढे नेले. स्टोक्सशिवाय डेव्हिड मलानने ७४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. वोक्सनेही ४५ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली.
इंग्लंड संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यानी नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण होते. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ बाद ३३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ३७.२ षटकांत १७९ धावांवर गारद झाला. या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.