भूपेन ललवाणीच्या कॉम्रेड शिल्डमध्ये नाबाद २०३ धावा; सध्याच्या रणजी ट्रॉफी निवडीसाठी तो आहे प्रबळ दावेदार

पुरुषोत्तम शिल्ड, कांगा लीग, पोलिस शिल्ड, शालिनी भालेकर आणि कॉम्रेड शिल्डमध्ये जोरदार धावा केल्या आणि या मोसमात त्याचे हे ५ वे शतक आहे आणि सध्याच्या रणजी ट्रॉफी निवडीसाठी तो प्रबळ दावेदार आहे.

    मुंबई : कर्नाटक क्रॉस मैदानावर झालेल्या कर्नाटक विरुद्ध MCA च्या युवा कॉमरेड शिल्डमध्ये भूपेन ललवाणीने (Bhupen Lalwani) नाबाद २०३ धावा केल्या (कॉम्रेड शिल्ड एक प्रकारचा रणजी निवड सामना आहे) आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या २५ वर्षांखालील शालिनी भालेकर ट्रॉफी (Shalini Bhalekar Trophy) निवड सामन्यात गुरुवारी नाबाद १०४ धावा केल्या.

    गेल्या ३ मोसमात तो मुंबई रणजी संघाचा भाग होता.गेल्या ३ वर्षांपासून संपूर्ण भारतातील BCCI U23/U25 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे.

    पुरुषोत्तम शिल्ड, कांगा लीग, पोलिस शिल्ड, शालिनी भालेकर आणि कॉम्रेड शिल्डमध्ये जोरदार धावा केल्या आणि या मोसमात त्याचे हे ५ वे शतक आहे आणि सध्याच्या रणजी ट्रॉफी निवडीसाठी तो प्रबळ दावेदार आहे कारण त्याने या हंगामात खेळलेल्या जवळपास प्रत्येक स्पर्धेत शतके झळकावली आहेत.