भुवनेश्वर कुमार ठरला सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय गोलंदाज

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच (Man Of The Match) म्हणजेच मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

    बंगळुरूमध्ये रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa) यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यात आला. मात्र पावसामुळं हा सामना रद्द झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं (Bhuvneshwar Kumar) उत्कृष्ट कामगिरी केली. ज्यामुळं त्याला मालिकावीर घोषित करण्यात आलं. त्यानंतर भुवनेश्वर कुमार हा सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच (Man Of The Match) म्हणजेच मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

    दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भुवनेश्वर कुमारनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. या मालिकेतील चार सामन्यात त्यानं सहा विकेट्स घेतले. या मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्यानं १४.१६ च्या सरासरीनं आणि १०.४ च्या स्ट्राईक रेटनं गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारच्या दमदार प्रदर्शनामुळं त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

    भुवनेश्वर कुमारनं २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरुद्ध मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्यांदा मालिकावीराचा पुरस्कार त्यानं जिंकला. महत्वाचं म्हणजे टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकणार भुवनेश्वर कुमार पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. भुवनेश्वर कुमारनं अनेक सामन्यात भेदक गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.