भुवनेश्वर कुमारची पत्नी  ट्रोलर्सवर भडकली

    दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. आशिया चषकात (Asia Cup) १९ व्या शतकात केलेल्या खराब गोलंदाजीनंतर भुवनेश्वरने त्याची शेवटच्या षटकातील खराब कामगिरीची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) टी-२० मालिकेती ही सुरु ठेवली. त्यामुळे भुवनेश्वरची गोलंदाजी भारताला भारी पडली असून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला प्रभावाची चव चाखायला लागली.

    भुवनेश्वरच्या याच कामगिरीनंतर सध्या तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर भुवनेश्वरला जोरदार ट्रोलिंगला सामोरे जावे लागत असून यावर त्याच्या पत्नीने संताप व्यक्त केला आहे. भुवीची पत्नी नुपूरने (Nupur Kumar)  इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ट्रोलर्सचे तोंड बंद करताना स्टोरीमध्ये लिहिले की, आजकाल लोक पूर्णपणे नाकारले गेले आहेत. आजकाल लोक इतके नालायक झाले आहेत, की त्यांच्याकडे करण्यासारखे काही चांगले नाही आणि द्वेष आणि मत्सर पसरवायला त्यांच्याकडे इतका वेळ आहे. त्या सर्वांना माझा सल्ला आहे की तुमच्या बोलण्याची किंवा तुमच्या असण्याची कोणालाच पर्वा नाही. म्हणून हा वेळ स्वतःला सुधारण्यासाठी घालवा.

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० सप्टेंबरला खेळल्या गेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने १९ व्या षटकात १६ धावा दिल्या. भुवी सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रभावी ठरत होता. पण डेथ ओव्हर्समध्ये तो दडपणाखाली दिसला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २०८ धावा केल्या. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ७१ धावा, तर केएल राहुलने ५५ आणि सूर्यकुमार यादवने ४६ धावा केल्या. २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने १९.२ षटकांत ६ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने ६१ आणि मॅथ्यू वेडने नाबाद ४५ धावा केल्या.