Deepak Chahar Withdrawn, Mohd Shami Ruled Out
Deepak Chahar-Mohammed Shami will not play in the ODI series

IND vs SA ODI 2023 : टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

    Deepak Chahar Withdrawn, Mohd Shami Ruled Out : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) दौऱ्यावर असून, टी-20 मालिका (T-20 Series) संपली आहे. आता टीम इंडिया वनडे आणि नंतर कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेचे आव्हान पार करणे टीम इंडियाला तसे अवघड जाणार आहे.

     

    वनडे मालिकेतून माघार
    बीसीसीआयने ट्वीट करीत यासंदर्भात माहिती दिली आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, चहरने बीसीसीआयला फॅमिली मेडिकल एमर्जन्सीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेत आहे. त्यामुळे दीपक चहरच्या जागी आकाश दीपचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

    मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने बाहेर

    वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 24 बळी घेणारा मोहम्मद शमीही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार नाही. मोहम्मद शमी दुखापतीने त्रस्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या खेळण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने मोहम्मद शमीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकातील हा स्टार गोलंदाज दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. आता मोहम्मद शामीऐवजी 17 डिसेंबरला होणाऱ्या जोहान्सबर्गमधील वनडे मालिका संपल्यानंतर श्रेयस अय्यर कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात सहभागी होईल.

    राहुल द्रविड यांच्याऐवजी सितांशु कोटक यांच्यावर जबाबदारी
    टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड, फलंदाजी कोच विक्रम राठोड, गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रे आणि फिल्डिंग कोच टी. दिलीप टेस्ट टीमसोबत जोडले जातील. तसेच, ते इंटर-स्क्वाड गेम आणि कसोटी सामन्यांसाठी खेळाडूंच्या प्रॅक्टिसवर लक्ष देतील. टीम इंडियाला वनडे सामन्यांसाठी एक नवीन प्रशिक्षक मार्गदर्शन करतील. यात भारत अ संघाच्या कोचिंग स्टाफचा समावेश आहे, ज्यात फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक, गोलंदाजी प्रशिक्षक राजीव दत्ता आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांचा समावेश आहे.

    दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा एकदिवसीय संघ
    ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, आकाश दीप