IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल

 गोलंदाज मोहसीन खानच्या (Mohsin Khan) जागी गुजरातचा वेगवान गोलंदाज रूश कलारिया (Roosh kalaria) याला सामिल करुन घेतलं आहे. आयपीएलने त्यांच्या संकेतस्थळावरुन ही माहिती दिली असून मोहसीनच्या तुलनेत रुश अनुभवी असल्याने याचा फायदा संघाला नक्कीच होणार आहे.

    IPL 2021 ची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (MIvsCSK) यांच्यात होणार आहे. आतापर्यंत ५ वेळा आय़पीएलचं खिताब पटकावलेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाही जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

    गोलंदाज मोहसीन खानच्या (Mohsin Khan) जागी गुजरातचा वेगवान गोलंदाज रूश कलारिया (Roosh kalaria) याला सामिल करुन घेतलं आहे. आयपीएलने त्यांच्या संकेतस्थळावरुन ही माहिती दिली असून मोहसीनच्या तुलनेत रुश अनुभवी असल्याने याचा फायदा संघाला नक्कीच होणार आहे. मोहसीनने आतापर्यंत केवळ एक प्रथम श्रेणी सामना खेळला असून १४ लिस्ट-ए आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत.

    रूशच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने गुजरातसाठी ५४ प्रथम श्रेणी सामने खेळत त्यात १६८ विकेट्स घेतले आहेत. तर ४६ लिस्ट-ए सामन्यात ६६ विकेट्स घेतले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन शतकांसह पाच अर्धशतकं लगावली आहेत. ११८ हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.