Uganda team enters T-20 World Cup 2023 after defeating Zimbabwe

    Uganda qualifies for T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी युगांडा पात्र ठरला आहे. गेल्या मंगळवारी, नामिबियाचा संघ आफ्रिका क्वालिफायरद्वारे टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला होता. टी-20 वर्ल्ड कप 2024 पुढील वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे.
    युगांडाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने झिम्बाब्वेचे स्वप्न भंगले असून पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेची कामगिरी चांगली होती. त्यांनी तीन सामने जिंकले होते. पाकिस्तानविरुद्ध 1 धावांनी मिळवलेल्या विजयाची अजूनही चर्चा होत आहे. तर वनडे वर्ल्ड कप 2019 आणि 2023 मध्येही झिम्बाब्वे पात्र ठरू शकला नाही.

    ICC पुरुष टी-20 वर्ल्ड कप आफ्रिका मधील पात्रता स्पर्धेतून सात संघ सहभागी झाले होते, त्यापैकी अव्वल दोन संघ टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळतील. युगांडाने सहा पैकी पाच सामने जिंकले आणि वर्ल्ड कपचे तिकीट बुक केले. युगांडाचा एकमेव पराभव नामिबियाविरुद्ध झाला.

    युगांडाने झिम्बाब्वेवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. झिम्बाब्वेबद्दल बोलायचे झाले तर नामिबिया आणि युगांडा विरुद्ध त्याला पराभवाचा सामना करावा लागला. आणि हे त्याच्यासाठी सर्वात जड ठरले.

    नामिबियाने सर्व पाच सामने जिंकून 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी आधीच पात्रता मिळवली आहे. युगांडाने आपला सहावा साखळी सामना जिंकून 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप आपले स्थान निश्चित केले. आता झिम्बाब्वेने केनियाविरुद्ध विजय मिळवला तरी 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही.