GT चा कर्णधार शुभमन गिलला मोठा धक्का, CSK विरुद्ध असे काय घडले ज्याची मिळणार शिक्षा

शतक आणि विजयानंतरही बीसीसीआयने शुभमन गिलला दंड ठोठावला आहे. याचे कारण काय ते सविस्तर वाचा.

    शुभमन गिल : काल चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये सामना रंगला होता. कालच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने चेन्नईचा 35 धावांनी पराभव केला. काल गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन या दोघांनी शतक ठोकून चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. गुजरात टायटन्स आता 12 सामन्यांतून 10 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे आणि चेन्नई सुपर किंग्स 12 सामन्यांतून 12 गुणांसह पराभूत होऊनही चौथ्या स्थानावर आहे. शुक्रवारी, गुजरातने आयपीएलमध्ये जिवंत राहण्यासाठी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा 35 धावांनी पराभव केला.

    शुभमन गिलला ठोठावला दंड
    शतक आणि विजयानंतरही बीसीसीआयने शुभमन गिलला दंड ठोठावला आहे. यावेळी हा दंड फक्त कॅप्टन गिलपुरता मर्यादित राहिला नाही तर संपूर्ण टीमला त्याचा फटका बसला. स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने गुजरातचा कर्णधार शुभमन गिलला दंड ठोठावला. स्लो ओव्हर रेटमुळे गुजरात टायटन्सला मोसमात दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेटमुळे संघाचा कर्णधार गिलला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित खेळाडूंना 25 टक्के मॅच फी किंवा 6 लाख रुपये, यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात येईल.

    काय आहे गुणतालिकेची स्थिती
    सध्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर 16 गुणांसह कोलकाता नाईट रायडर्स आहे तर राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 14 गुणांसह सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. तर कालच्या पराभवानंतरही चेन्नई सुपर किंग्स 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. चेन्नई च्या रांगेत 12 गुणांसह दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. बंगळुरू आणि गुजरातचे प्रत्येकी 10 गुण आहेत. बंगळुरूचा संघ सातव्या स्थानावर आहे तर गुजरात टायटन्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत, परंतु हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.