बर्थ डे गर्ल अंशू मलिकने भारताला दिले रौप्य पदकाचे गिफ्ट

    बर्लिंगहम येथे सुरु असलेल्या राष्टकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी सलग आठव्या दिवशीही दमदार कामगिरी केली आहे. यात भारताला कुस्ती (Wrestling) खेळातील पहिले पदक हे महिला कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik)हिने मिळवून दिले आहे. ५७ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात अंशूने हे पदक पटकावले असून तिला नायजेरियाच्या ओडूनायोने हिने मात दिल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे ५ ऑगस्ट रोजी अंशू हीचा वाढदिवस (Birthday) असल्याने सामना जिंकत तिने स्वतःला आणि भारताला रौप्य पदकाचे(Silver medal)गिफ्टच दिले आहे.

    प्रथमच राष्टकुल स्पर्धेत पदार्पण केलेली अंशू ही सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्मात होती. सेमीफायनलमध्ये देखील तिने प्रतिस्पर्ध्यावर चांगला विजय मिळवत फायनल मध्ये इंट्री घेतली होती. फायनल मध्ये देखील अंशूने प्रतिस्पर्धी नायजेरियाच्या ओडूनायो हिला कडवी झुंज दिली. अगदी शेवटच्या १० सेकंदात अंशूने दोन गुण मारले परंतु अखेर ६-४ या फरकाने नायजेरियाच्या ओडूनायो हिने बाजी मारून सुवर्ण पदक पटकावले.

    अंशू मलिकने मिळवलेल्या यशानंतर सर्वस्थरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान मोदी (PM Modi)यांनी देखील ट्विट द्वारे तिला शुभेच्छा दिल्या आहेत.