बॉम्बस्फोटाने आंतरराष्ट्रीय स्टेडियम हादरले; खेळाडूंसह सर्व प्रेक्षक सुरक्षित

काबुलमधील क्रिकेट ग्राऊंडमध्ये सदर स्फोटाची घटना घडली आहे. घटनास्थळावर अजूनतरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही. क्रिकेट स्टेडियमवर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.

    काबुल : अफगाणिस्तानातील (Afghanistan) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये (International Cricket Stadium) बॉम्बस्फोट (Bomb Blast) झाला आहे. काबुलमधील (Kabul) क्रिकेट ग्राऊंडमध्ये सदर स्फोटाची घटना घडली आहे. घटनास्थळावर अजूनतरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.

    क्रिकेट स्टेडियमवर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. शपीजा क्रिकेट लीगचा (Shpageeza Cricket League) आठवा हंगाम १८ जुलैपासून सुरू झाला. शुक्रवारी, लीगचा २१ वा सामना आमो शार्क (Amo Shark) आणि स्पिन घर टायगर्स (Spin Ghar Tigers) यांच्यात खेळवण्यात आला.

    बॉम्ब स्फोटानंतर सर्व खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात आले आहे. स्टेडियमवर हल्ला झाला तेव्हा तेथे संयुक्त राष्ट्राची एक व्यक्ती उपस्थित होती, जी मुलाखतीसाठी तिथे पोहोचली होती असे सांगण्यात आले आहे.