FIFA विश्वचषकात ब्राझीलचा सर्बियावर 2-0 ने विजय

सामन्याच्या फर्स्ट हाल्पमध्ये सर्बियाच्या डिफेन्सने चांगला खेळ दाखवला. ब्राझीलकडे नेमारसारखे स्टार फॉरवर्ड असूीन त्यांची सततची आक्रमणं सर्बियाच्या बचावपटूंनी रोखली. गोलकिपर मिलिंकोविकने देखील काही उत्कृष्ट सेव्ह केले. पण दुसऱ्या हाल्फमध्ये रिकार्लिसनने 62 व्या आणि 73 व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

    कतार (Qatar)  येथे सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) ब्राझील विरुद्ध सर्बिया यांच्यात सामना खेळवण्यात आला. फिफा विश्वचषक २०२२ मधील संभाव्य विजेत्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ब्राझील संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. ब्राझीलने सर्बियाचा २-० ने पराभव केला. तसेच या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लीसनने पहिली बायसिकल किक मारून एक उत्कृष्ट गोल केला. या गोलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    सामन्याच्या फर्स्ट हाल्पमध्ये सर्बियाच्या डिफेन्सने चांगला खेळ दाखवला. ब्राझीलकडे नेमारसारखे स्टार फॉरवर्ड असूीन त्यांची सततची आक्रमणं सर्बियाच्या बचावपटूंनी रोखली. गोलकिपर मिलिंकोविकने देखील काही उत्कृष्ट सेव्ह केले. पण दुसऱ्या हाल्फमध्ये रिकार्लिसनने 62 व्या आणि 73 व्या मिनिटाला गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

    सामन्यात, ब्राझीलने अधिक पजेशन स्वत:कडे ठेवलं, 53 टक्के पजेशन ब्राझीलकडे तर 34 टक्के पजेशन सर्बियाकडे होतं. ब्राझीलने सर्बियाच्या गोलपोस्टवर तब्बल 24 वेळा आक्रमणं केलं, दुसरीकडे, सर्बियाचे फॉरवर्ड्स केवळ 4 प्रयत्नच करू शकले. ब्राझीलच्या खेळाडूंनी 526 पास पूर्ण झाले, तर सर्बियन खेळाडूंनी 341 पासच पूर्ण केले. कॉर्नर आणि फ्री किक मिळवण्यातही ब्राझीलचा संघ पुढे होता. ब्राझीलला 6 कॉर्नर आणि 12 फ्री किक मिळाल्या. दुसरीकडे, सर्बियाला 4 कॉर्नर आणि 8 फ्री किक मिळाल्या. ब्राझील आणि सर्बियाचा संघ जी गटात आहे. स्वित्झर्लंड आणि कॅमेरूनचे संघही त्यांच्यासोबत आहेत. येथे ब्राझील पहिल्या तर स्वित्झर्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    बायसिकल किकचा व्हिडीओ व्हायरल :
    फिफा विश्वचषकाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून ब्राझीलच्या रिचार्लीसनने मारलेल्या बायसिकल किकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. २० सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल होत असून कीक मारल्यानंतर ब्राझीलच्या संघाने केलेला जल्लोष या व्हिडिओमध्ये दिसत आहे.