T20 World Cup 2024: Veteran Bollywood star came out in support of KL Rahul, gave a big statement on T20 World Cup selection

IND vs SA : संजू सॅमसनने आपल्या पहिल्या वनडे शतकासह टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा वनडे मालिका जिंकून दिली. या विजयानंतर कर्णधार केएल राहुलने संजूचे खूप कौतुक केले आहे.

  बोलंड पार्क पार्ल : टीम इंडियाने काल झालेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला त्यांच्या होम ग्राऊंडवर धूळ चारत मालिका खिशात टाकली. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा २-१ असा पराभव केला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार्लमध्ये खेळला गेला. या सामन्यात संजू सॅमसनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आणि संघाला विजयी धावसंख्या बनवण्यात मोठी भूमिका बजावली.

  संजूच्या शतकामुळे टीम इंडियाची मोठी धावसंख्या

  संजू सॅमसनचे हे शतक खूपच खास होते कारण तो फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडिया अडचणीत आली होती. संजूने तिलक वर्मासोबत शतकी भागीदारी करून टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. संजूच्या शतकामुळे टीम इंडियाने चांगली धावसंख्या गाठली आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत सामना आणि मालिका दोन्हीवर कब्जा केला.

  आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करा

  भारताच्या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल म्हणाला, विश्वचषकात निराशेचा सामना केल्यानंतर क्रिकेटच्या मैदानात परतल्याने चांगले वाटत आहे. आयपीएलमध्ये आम्ही या सर्व मुलांसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यांच्यासोबत राहून इथे खेळायला मजा येत आहे. मी त्यांना फक्त एकच सांगतो की खेळाचा आनंद घ्या आणि आपले बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, बाकी कशाचाही विचार करू नका.

  काय म्हणाला केएल राहुल?

  केएल राहुल पुढे म्हणाला, हे सर्व शानदार क्रिकेटपटू आहेत, परंतु काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले नव्हते. त्यामुळे त्यांना जुळवून घेण्यास थोडा वेळ लागतो. प्रत्येकाची भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि त्यांनी त्यांचे १०० टक्के दिले पाहिजे. याशिवाय केएल राहुल संजू सॅमसनबद्दल बोलताना म्हणाला, संजूने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. दुर्दैवाने त्याला विविध कारणांमुळे टॉप ऑर्डरमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत. पण आज त्याला चांगली कामगिरी करताना पाहून आनंद झाला.

  भारताने मालिका 2-1 ने जिंकली

  प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाने २९६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. संजू सॅमसनने शतक झळकावले, त्याने ११४ चेंडूत १०८ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तिलक वर्मानेही ५२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली, त्यांचा सलामीवीर टोनी डी जोर्झी याने ८१ धावांची शानदार खेळी केली. जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत भारतावर दबाव होता पण तो बाद झाल्यानंतर विकेट पडत राहिल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ४ विकेट, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. भारताने निर्णायक सामना ७८ धावांनी जिंकून मालिका २-१ ने जिंकली.