कार्लसनने जिंकली जागतिक बुद्धीबळ स्पर्धा, प्रग्नानंदने दिली कडवी झुंज

    Chess World Cup 2023 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने 18 वर्षांच्या प्रग्नानंदचा रॅपिड फायरच्या पहिल्या गेममध्ये पराभूत करीत वर्ल्डकपवर नाव कोरले. कार्लसनने पहिल्यांदाच वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. भारताकडून प्रग्नानंदने दर्जेदार खेळाची चुणूक दाखवली तरीही दुसऱ्या गेममध्ये दोघांनी चांगला खेळ केल्याने अखेरीस कार्लसनला विजेता घोषित करण्यात आले.
    25 मिनिटांच्या पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी आपले वजीर गमावला होता. प्रग्नानंद 19 मिनिटांपर्यंत पोहचला होता, तर कार्लसन हा 14 मिनिटापर्यंत होता. कार्लसन हा पिछाडवीर गेला होता. यानंतर दोघांनीही 18 व्या चालीनंतर आपली क्वीन गमावली.
    प्रग्नानंदने 25 व्या चालीपर्यंत आपली स्थिती सुधारली होती. आता त्यांच्याकडे फक्त 5 मिनिटे शिल्लक होती. पहिला टाय ब्रेकर गेम हा खूप टाईट झाला. 34 व्या चालीनंतर दोघांनीही आपला हत्ती गमावला होता. प्रग्नानंदच्या हातून वेळ निसटून चालली होती. अखेर पहिला रॅपिड गेम कार्लसनने जिंकला.
    दुसऱ्या गेममध्ये दोघांनीही आक्रमक चाली रचल्या. दोघांचेही 10 चालीनंतर आपले घोडे गमावले होते. 14 व्या चालीपर्यंत कार्लसन चांगल्या स्थितीत होता. त्यानंतर दोघांनीही 18 व्या चालीत आपापल्या क्वीन गमावल्या. अखेर दुसरा गेम ड्रॉ झाला.