पर्पल कॅपसाठी चहलला हसरंगाचे कडवे आव्हान

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे, तर पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे आहे. यंदाच्या हंगामात चहलने अफलातून मारा केला आहे. मात्र, रविवारी झालेल्या बेंगलोर आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा चहलच्या खूप जवळ आला आहे. हैदराबादविरोधात पाच विकेट्स घेत हसरंगा पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे(Chahalla Hasaranga's bitter challenge for the Purple Cap).

    मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थानच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे, तर पर्पल कॅप युजवेंद्र चहलकडे आहे. यंदाच्या हंगामात चहलने अफलातून मारा केला आहे. मात्र, रविवारी झालेल्या बेंगलोर आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यानंतर श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा चहलच्या खूप जवळ आला आहे. हैदराबादविरोधात पाच विकेट्स घेत हसरंगा पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे(Chahalla Hasaranga’s bitter challenge for the Purple Cap).

    दोघांमध्ये फक्त एका विकेटचा फरक आहे. चहलच्या नावावर 22 विकेट्स आहेत तर हसरंगा 21 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चहलने यंदाच्या हंगामामध्ये 11 सामन्यांत 44 षटके गोलंदाजी केली करताना 7.25 धावा प्रतिषटक खर्च केल्या आहेत. 14.50 च्या सरासरीने चहलने 22 बळी मिळवले आहेत. म्हणजे प्रत्येक विकेटकरता चहलने 14 धावा खर्च केल्या आहेत.

    हसरंगाने 12 सामन्यांत 21 बळी घेऊन चहलला जोरदार आव्हान दिले आहे. तो पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबचा कागिसो रबाडा 18, दिल्लीचा कुलदीप यादव 18 आणि हैदराबादचा नटराजन 17, अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.