सौरव गांगुलीचा बदलला पत्ता, BCCI अध्यक्षांनी 40 कोटींना खरेदी केला नवीन बंगला

बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने कोलकाता येथे नवीन घर विकत घेतले आहे. 48 वर्षांपासून ते त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते.

    कोलकाता: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोलकाता येथे नवीन घर विकत घेतले आहे. आतापर्यंत ते त्यांच्या 48 वर्षांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. मात्र आता गांगुलीने आपला पत्ता बदलला आहे. कोलकात्याच्या लोअर रोडन स्ट्रीटमध्ये त्यांनी हे घर घेतले आहे. गांगुलीच्या या दुमजली घराची किंमत सुमारे 40 कोटी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते लवकरच या घरात शिफ्ट होतील. घर खरेदी केल्यानंतर गांगुलीने प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला.

    भारताचा माजी कर्णधार गांगुली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा चर्चेत होता आणि आजही हा ट्रेंड कायम आहे. गांगुलीच्या वडिलोपार्जित घराचे खूप कौतुक झाले आहे. सचिन तेंडुलकरने आपल्यासोबत त्या घरी जेवल्याचे त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. सचिनसोबतच संघातील इतर खेळाडूंनीही गांगुलीच्या त्या वडिलोपार्जित घरात वेळ घालवला आहे.

    bcci president sourav ganguly bought new bungalow price 40 crore in lower rawdon street kolkata

    ‘द टेलिग्राफ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, घर विकत घेतल्यानंतर गांगुली म्हणाला, “माझ्याकडे स्वतःचे घर असल्याने मला आनंद आहे. मी जवळपास 48 वर्षे माझ्या शेवटच्या घरात राहिलो. ते घर सोडणे थोडे कठीण होते.

    विशेष म्हणजे गांगुलीची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11363 धावा केल्या आहेत. यादरम्यान गांगुलीने 22 शतके आणि 72 अर्धशतके केली आहेत. त्याने 113 कसोटी सामनेही खेळले आहेत. गांगुलीने 188 डावात 7212 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत.