आयपीएल प्ले ऑफच्या नियमात बदल; 5-5 षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल

इंडियन प्रीमिअर लीग 2022 च्या साखळी फेरीचे सर्व सामने पार पडले आणि गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता प्ले ऑफच्या लढतींची उत्सुकता लागली आहे. पण, बीसीसीआयने त्यासाठी काही नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 5-5 षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल अन् फायनलसाठी मध्यरात्री 1.20 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे(Changes In IPL Play-Off Rules 5-5 overs match result in Super Over).

  मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग 2022 च्या साखळी फेरीचे सर्व सामने पार पडले आणि गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता प्ले ऑफच्या लढतींची उत्सुकता लागली आहे. पण, बीसीसीआयने त्यासाठी काही नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 5-5 षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल अन् फायनलसाठी मध्यरात्री 1.20 वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे(Changes In IPL Play-Off Rules 5-5 overs match result in Super Over).

  क्वालिफायर 1 व एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर 24 व 25 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. 24 तारखेला गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा क्वालिफायर 1 सामना होईल. 25 तारखेला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा एलिमिनेटर सामना खेळवला जाईल.

  27 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर 2 व 29 मे रोजी फायनल सामना खेळवला जाईल. गुजरात, लखनौ या दोन नव्या संघाने पहिल्याच पर्वात प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली, तर 2008 च्या विजेत्या राजस्थानसह बंगळुरूही अव्वल चौघांत आला. प्ले ऑफच्या सर्व सामन्यांचा अगदी फायनलचा निकाल निर्धारीत षटकांत न लागल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल. हवामानामुळे किंवा अन्य काही परिस्थितीमुळे सामना होऊच शकला नाही, तर साखळी फेरीतील कामगिरीवर विजेता संघ ठरवला जाईल. अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, परंतु क्वालिफायर 1, एलिमिनेटर व क्वालिफायर 2 साठी कोणताच राखीव दिवस नसेल.

  व्यत्यय आल्यास 5-5 षटकांची सामने

  प्ले ऑफच्या लढती दरम्यान पाऊस खोडा घालण्याची शक्यता आहे. अशा वेळी अतिरिक्त 200 मिनिटे राखीव ठेवण्यात आली आहेत. जर, अंतिम सामना सोडून अन्य तीन प्ले ऑफ लढती सुरू होण्यास विलंब होत असल्यास, ते सामने 9.40 पासून खेळवण्यात येतील. अंतिम सामन्यासाठी हीच वेळ 10.10 अशी ठरवण्यात आली आहे. सामना उशीरा सुरू झाल्यास दोन स्ट्रॅटेजिक टाईम आऊट असतील, परंतु इनिंग्जच्या मधल्या वेळेला कात्री लागेल. प्ले ऑफच्या लढतीत व्यत्यय आल्यास 5-5 षटकांची सामने खेळवण्यात येतील आणि त्यात टाईम आऊट नसेल. या सामन्यांची सुरुवातीची वेळ ही 11.56 अशी असेल आणि 10 मिनिटांच्या ब्रेकनंतर तो 12.50 पर्यंत संपवावा लागेल. अंतिम सामन्यासाठी सुरुवातीच वेळ ही 12.26 अशी ठरवण्यात आली आहे.

  दोन तासांचा अतिरिक्त वेळ

  आयपीएल फायनल ही 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. नियोजित तारखेला अंतिम सामना होऊ न शकल्यास तोच सामना पुढील दिवशी होईल. दोन क्वालिफायर व एलिमिनेटर सामन्यात एका डावानंतर पुढील खेळ होऊ न शकल्यास DLS प्रणालीचा वापर केला जाईल. 29 मे रोजी समजा एक चेंडू टाकून सामना थांबवावा लागला, तर पुढील दिवशी तो तिथून पुढे सुरू होईल. पण, नाणेफेक झाल्यानंतर सामना खेळवता न आल्यास राखीव दिवशी पुन्हा नाणेफेक होईल. अंतिम सामन्यासाठी 5 तास 20 मिनिटांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. दोन तासांचा अतिरिक्त वेळ हा पावसाचा व्यत्यय किंवा अन्य व्यत्ययासाठी राखीव ठेवला आहे. समजा जर अंतिम सामन्यात दोन्ही दिवशी सामना होऊच शकला नाही, तर निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला जाईल. त्यासाठी मध्यरात्री 1.20 वाजल्याची वेळ ठरवण्यात आली आहे. यावेळेत सुपर ओव्हर सुरू झाली पाहिजे.