राजस्थान रॉयलचा तीन धावांनी विजय, शेवटपर्यंत चाललेल्या थरारक सामन्यात सीएसके अखेर पराभूत

आयपीएलमधील 16 हंगामातील 17 वा सामना आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंगला तीन धावांनी मात दिली. शेवटपर्यंत हाय व्होल्टेज चाललेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजांनी शेवटपर्यंत सामन्याची उत्कंठा वाढवली होती, परंतु राजस्थान रॉयलच्या गोलंदाजांनी शेवटच्या चेंडूवर धावा रोखून धरल्या आणि राजस्थान रॉयल्स तीन धावांनी विजयी झाले. राजस्थान रॉयल च्या जबरदस्त कामगिरीने आयपीएलच्या गुणतालिकेत आरआर आता पहिल्या स्थानावर पोचले आहे.

    चेन्नई : आयपीएलचा सर्वात हाय होल्टेज सामना आज चेन्नईच्या चक चेपॉक स्टेडियम खेळला गेला अखेरपर्यंत चेन्नई सुपर किंग्स लढत राहिली, परंतु तीन धावांनी त्यांचा पराभव झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटपर्यंत झुंजार लढत दिली परंतु शेवटच्या बॉल मध्ये पाच रन हवे असताना ते पाच रन राजस्थान रॉयलने करून दिले नाही आणि चेन्नई सुपर किंगला पराभवाचा सामना करावा लागला.

    चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आरआरची पहिली जोडी फलंदाजीसाठी मैदानात आली आहे. आज आयपीएलमध्ये चेन्नईच्या होम ग्राऊंड चेपॉक स्टेडियमवर सीएसके आणि राजस्थान रॉयल आमने-सामने भिडणार आहेत.

    राजस्थान रॉयल्सची फलंदाजी :

    जोस बटलर आणि देवदत्त पडिकल नंतर आर अश्विनने राजस्थानकडून चांगली फलंदाजी केली. जोस बटलर ३५ चेंडूत ५२ धावांवर खेळत आहे. पडिकलने २६ धावांवर ३८ धावा केल्या, त्यानंतर आलेला कर्णधार संजू सॉमसन खाते न उघडता जडेजाद्वारे क्लिन बॉल्ड होऊन तंबूत परतला. रवीचंद्रन अश्विनने जोसला चांगली साथ देत २२ चेंडूत दमदार ३० धावा केल्या. त्यानंतर आलेला शिमरन हेटमर सध्या खेळत आहे. चेन्नईने आज राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यानंतर यशस्वी जयस्वाल ८ चेंडूत १० धावा करून लवकरच तंबूत परतला. त्यानंतर जोस बटलर आणि देवदत्त पडिकलची चांगलीच जोडी जमली. जोस बटलर सध्या ३४ धावांवर खेळत आहे, तर पडिकल ३८ धावांवर खेळत आहे.

    चेन्नईला नक्कीच फायदा : 

    चेन्नईच्या होम ग्राऊंडचा चेन्नईला नक्कीच फायदा होणार आहे. तरीही राजस्थान रॉयलची स्पिनरची जोडगोळी त्यांना धोकादायक ठरू शकते. कारण होम बॉय आर अश्विनला या मैदानाची आणि पिचची चांगलीच माहिती असल्याने, तो याचा फायदा उठवू शकतो. तर युजवेंद्र चहल सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सीएसकेसाठी हे म्हणावे तितके सोपे असणार नाही. सामना निश्चितच रंगतदार होणार आहे.

    चेन्नई सुपर किंग्जसमोरील समस्या :

    दीपक चहरच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो काही सामन्यांसाठी बाहेर राहणार आहे. पायाच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स मुंबईविरुद्ध खेळू शकला नाही. आजच्या सामन्यातही तो न खेळण्याची शक्यता आहे. असेच संकेत जडेजाने सामनापूर्व पत्रकार परिषदेत दिले होते. मुंबईविरुद्ध २७ चेंडूत ६१ धावा केल्यानंतर संघ अजिंक्य रहाणेला आणखी एक संधी देऊ इच्छितो.

    दोन्ही संघातील गोलंदाज विरुद्ध फलंदाज :

    ट्रेंट बोल्ट विरुद्ध गायकवाड आणि बटलर विरुद्ध सीएसके स्पिनर्सची लढत हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरू शकते. आयपीएल 2023 मध्ये पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी करणारे दोन्ही आघाडीचे संघ आज पॉवरप्लेमध्ये कशी फलंदाजी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणात, रॉयल्सचा धावगती 11.66 आहे आणि त्यांनी पहिल्या सहा षटकांमध्ये प्रति गडी सरासरी 52.5 धावा केल्या आहेत, तर चेन्नई सुपर किंग्जचा धावगती 11.00 आणि प्रति गडी सरासरी 66 धावा आहे.

    दोन बलाढ्य संघात होणार रंगतदार सामना :

    आयपीएलमधील सर्वाधिक विजेत्या संघापैकी एक असलेला संघ म्हणू सीएसकेची ओळख आहे. त्याबरोबर सर्वाधिक नेतृत्व करणाऱा कर्णधारांपैकी एमएस धोनीचा विक्रम झाला आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा संघाचे नेतृत्व केले आहे. अशा अनुभवी संघाविरुद्ध आज राजस्था रॉयल्स आमने-सामने असणार आहे. तसे पाहत या हंगामात आरआऱची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यांनी आपल्या तडफदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.