चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोणत्या संघाचं पारडं जड?

गुणतालिकेचा विचार केला तर राजस्थान रॉयल्स सध्या दुसऱ्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

  CSK vs RR : आयपीएल २०२४ च्या (IPL 2024) या रविवारी दोन सामने रंगणार आहेत, यामध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. राजस्थान रॉयलने आज विजय मिळवला तर आज प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर जर चेन्नई सुपर किंग्सचा संघाचा जर आज पराभव झाला तर त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर करण्यात येईल. गुणतालिकेचा विचार केला तर राजस्थान रॉयल्स सध्या दुसऱ्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. या सामन्यासाठी सीएसके आणि राजस्थान संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात. राजस्थानने या मोसमात 8 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 6 सामने जिंकले आहेत.

  जाणून घ्या दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी

  प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. आकडेवारीवर नजर टाकली तर चेन्नईचा वरचष्मा दिसतो. सीएसकेने राजस्थानविरुद्ध आतापर्यंत 15 सामने जिंकले आहेत. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने 13 सामने जिंकले आहेत. मात्र गेल्या 7 सामन्यांपैकी राजस्थानने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. या सामन्यात सीएसकेसाठी समस्या अशी आहे की मथिशा पाथिराना आणि दीपक चहर या सामन्यात खेळू शकणार नाहीत. हे दोन्ही खेळाडूंना सामन्यादरम्यान दुखापत झाली आहे.

  आजच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र हे दोन फलंदाज सलामी देऊ शकतात. प्लेइंग इलेव्हनमध्ये शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना खेळणार आहे. या संघात मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकतो. कर्णधार संजूसोबतच यशस्वी जैस्वाल राजस्थानसाठी चमत्कार करू शकते. यशस्वीने काही सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर शिमरॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांना संधी मिळू शकते. ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे.

  जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११

  चेन्नई सुपर किंग्ज :
  रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.

  राजस्थान रॉयल्स :
  यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, शुभम दुबे/ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, डोनोवन फरेरा/शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र शर्मा, संदीप चहल.