आज भिडणार चेन्नई आणि हैदराबाद, जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी

या सामन्याद्वारे हैदराबादचा संघ टॉप-4 मध्ये आपले स्थान कायम राखू इच्छितो, तर चेन्नईचा संघ टॉप-4 मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

  चेन्नई आणि हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये आज 28 एप्रिल रोजी रविवारी सामान्यांचा डबल धमाका होणार आहे. यामध्ये पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. दोघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याद्वारे हैदराबादचा संघ टॉप-4 मध्ये आपले स्थान कायम राखू इच्छितो, तर चेन्नईचा संघ टॉप-4 मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

  चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यत 8 सामने खेळले आहेत, ज्यात 4 जिंकले आणि 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, हैदराबादनेही 8 सामने खेळले, परंतु 5 जिंकले आणि 3 गमावले आहेत. आज दोन्ही संघ मैदानात प्लेऑफ मध्ये जागा मिळवण्याच्या हेतूनेच हा सामना खेळतील आणि जिंकण्याच्याच उद्देशानेच खेळतील. याआधी या दोघांच्या लढतीत हैदराबादने चेन्नईचा पराभव केला होता.

  कुणाचं पारडं जड?
  आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराजर्स हैदराबाद यांच्यात 20 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये चेन्नईने आघाडी घेतली असून 14 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने 6 सामने जिंकले आहेत. मात्र, हैदराबादने शेवटच्या चकमकीत चेन्नईचा पराभव केला होता.

  चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथीराना.
  प्रभावशाली खेळाडू- शार्दुल ठाकूर.

  सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
  इम्पॅक्ट प्लेयर- टी नटराजन.