अपमान विसरून आयपएल खेळणार; आरसीबी आणि पंजाबला ट्रॉफी मिळवून देण्याचे ख्रिस गेलचे स्वप्न

वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने इंडियन प्रीमिअर लीग 2022मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, या निर्णयामागचे धक्कादायक कारण त्याने आज जगासमोर आणले. मागील काही वर्षांत त्याला आयपीएलमध्ये अपेक्षित आदर मिळत नव्हता, असा गौप्यस्फोट त्याने केला होता. मात्र आता तो पुन्हा IPL मध्ये कम बॅक करण्याच्या तयारीत आहे(CChris Gayle Come Back in IPL).

    आयपीएलमधील मोठा स्टार असलेल्या गेलने आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व पंजाब किंग्स अशा तीन फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले. पण मागील काही वर्षांत गेलला अंतिम 11 मध्येही ग्राह्य धरले गेले नव्हते. त्यानंतर त्याने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात बायो बबलच्या थकव्यामुळे माघार घेतली.

    आयपीएलमध्ये कोलकाता, आरसीबी आणि पंजाब या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. मला आरसीबी आणि पंजाब संघापैकी एकाला विजेतेपद मिळवून द्यायला आवडेल. मला वेळेसोबत अधिक चांगले खेळायला आवडते आणि मला आव्हाने आवडतात, त्यामुळे पुढे काय होईल ते पाहू, असे त्याने सांगितले.