दे घुमा के..! चेन्नईची उडाली तारांबळ, कॅप्टनकूल धोनीसह तीन गडी बाद ; बोल्टच्या खात्यात दोन विकेट्स

पहिल्या षटकात फाफ डुप्लेसी शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या षटकात मोईन अलीही शून्यावर बाद झाला आहे. दोन गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला रायडू दुखापतग्रस्त झाल्याने तो तंबूत परतला आहे.

    आयपीएल २०२१ चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians Vs Chennai Super Kings)यांच्यामध्ये खेळवला जात आहे. चेन्नई सुपरकिंग्जनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे नसून कायरन पोलार्डकडे संघाची धुरा देण्यात आली आहे.

    पहिल्या षटकात फाफ डुप्लेसी शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या षटकात मोईन अलीही शून्यावर बाद झाला आहे. दोन गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला रायडू दुखापतग्रस्त झाल्याने तो तंबूत परतला आहे. चेन्नईचे एकामागोमाग एक गडी बाद होत असून सुरेश रैना देखील झेलबाद झाला आहे. बोल्टने दोन विकेट्स घेतल्या आहेत.

    चेन्नईचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनी क्रिजवर होते. परंतु चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीही बाद झाला असून चेन्नईला मोठा धक्का बसला आहे.