avinash sable

अविनाश साबळे याने (Avinash Sable) याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत ८ मिनिटे ११.२० सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला आहे.

    बर्मिंगहॅम: अविनाश साबळे याने (Avinash Sable) कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:११:२० अशी वेळ नोंदवली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गोस्वामीने १० किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं होतं. आता अविनाशनेही भारतासाठी रौप्य पदक मिळवून दिलं आहे. अविनाश हा मुळचा महाराष्ट्रातला आहे.

    अविनाश याने याआधी देखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत ८ मिनिटे ११.२० सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला आहे. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या खेळात केनियाच्या अब्राहमने ८.११.१५ मिनिटं इतकी वेळ घेत सुवर्णपदक जिंकल. तर कांस्यपदकही केनियाच्या खेळाडूने जिंकलं. आमोस सेरेमने याने ८.१६.८३ मिनिटांचा वेळ घेत कांस्यपदक जिंकलं.